DC vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रोहितने जिंकला टॉस, जोफ्रा आर्चर खेळणार की नाही? जाणून घ्या दिल्ली-मुंबईची Playing XI

आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना खेळवला जात आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील १६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात मंगळवारी खेळवला जात आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असून हे दिल्ली कॅपिटल्सचे घरचे मैदान आहे.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये ट्रिस्टन स्टब्सऐवजी रिली मॅरेडिथला संधी दिली आहे. तसेच रोहितने अशीही माहिती दिली आहे की जोफ्रा आर्चर या सामन्यासाठी उपलब्ध नाही. जोफ्राला दुखापत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याच्याबाबतीत जोखीम पत्करत नसल्याचेही चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात रोहितने सांगितले होते.

तसेच दिल्ली कॅपिटल्सनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. खलील अहमद दुखापतग्रस्त झाल्याने यश धूलला संधी देण्यात आली आहे. तसेच रिली रोसौच्या जागेवर मुस्तफिझुर रेहमानला संधी देण्यात आली आहे.

तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार वॉर्नरशिवाय रोवमन पॉवेल, एन्रिच नॉर्किया आणि मुस्तफिझूर रहमान या परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.

तसेच मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीन, रिले मेरेडिथ आणि जेसन बऱ्हेनडॉर्फ या तीन परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी किंवा भारतीय खेळाडूला संधी देऊ शकतात.

अशी आहे प्लेइंग इलेव्हन -

  • दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एन्रिच नॉर्किया, मुस्तफिझूर रहमान

    राखीव खेळाडू - अमन खान, मुकेश कुमार, सर्फराज खान, प्रविण दुबे, इशांत शर्मा

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्शद खान, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेनडॉर्फ

    राखीव खेळाडू - ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, अर्जून तेंडुलकर, रमनदीप सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT