Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

Ruturaj Gaikwad Fifty: दिल्लीत ऋतु'राज'! ताबडतोड फिफ्टी ठोकत गुरुचाच मोडला रेकॉर्ड

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad Break Michael Hussey's Record: शनिवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने एक मोठा विक्रमही नावावर केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून सलामीला खेळताना ऋतुराजने 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 79 धावांची खेळी केली. ऋतुराजची चेन्नईकडून खेळताना सलामीला 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही 14 वी वेळ होती. त्याने आत्तापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत चेन्नईकडून सलामीला खेळताना 13 अर्धशतके आणि 1 शतक केले आहे.

त्यामुळे आयपीएलमध्ये चेन्नईकडून सलामीला सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋतुराज आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने मायकल हसीला मागे टाकले आहे. हसीने चेन्नईकडून सलामीला खेळताना 13 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला होता. विशेष म्हणजे सध्या हसी चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहे.

चेन्नईकडून सलामीला सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे. फाफ डू प्लेसिसने 16 वेळा सलामीला खेळताना 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

डेवॉन कॉनवेचेही अर्धशतक

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात ऋतुराजचा साथीदार सलामीवीर डेवॉन कॉनवेनेही अर्धशतक केले. त्याने 52 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यामुळे तो चेन्नईकडून सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत शेन वॉटसन आणि मुरली विजय यांच्यासह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आला आहे.

चेन्नईकडून सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारे सलामीवीर

  • 16 वेळा - फाफ डू प्लेसिस

  • 14 वेळा - ऋतुराज गायकवाड

  • 13 वेळा - मायकल हसी

  • 9 वेळा - डेव्हॉन कॉनवे

  • 9 वेळा - शेन वॉटसन

  • 9 वेळा - मुरली विजय

चेन्नईच्या 200 + धावा

शनिवारी कॉनवे आणि ऋतुराज यांच्यानंतर चेन्नईकडून शिवम दुबेने 9 चेंडूत 22 धावांची आणि रविंद्र जडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावांची नाबाद खेळी केली. तसेच एमएस धोनी 5 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 3 बाद 223 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT