DC vs CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेन्नई प्लेऑफचं डायरेक्ट तिकीट मिळवणार की दिल्लीचा शेवट गोड होणार? पाहा Playing XI

DC vs CSK: आयपीएल 2023 स्पर्धेत शनिवारी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (20 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी चेन्नईने त्यांच्या संघात बदल केलेला नाही. पण दिल्ली संघात काही बदल झाले आहेत. दिल्लीने ललित यादव, चेतन साकारिया या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच इशांत शर्मा संघातून बाहेर झाला आहे.

त्याचबरोबर या सामन्यासाठी चेन्नईने डेव्हॉन कॉनवे, मोईन अली आणि महिश तिक्षणा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच दिल्लीने कर्णधार डेव्हिड वॉर्नर, फिलिप सॉल्ट, रिली रोसौ आणि एन्रिच नॉर्किया या परदेशी खेळाडूंना दिली आहे.

त्यामुळे चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडूंना संधी दिली असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते परदेशी किंवा भारतीय खेळाडूला संधी देऊ शकतात. पण दिल्लीच्या संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच संधी देता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये चेन्नईने मथिशा पाथिराना, मिचेल सँटेनर, सुभ्रांशू सेनापती, शेख राशीद आणि आकाश सिंग यांना निवडले आहे. तसेच दिल्लीने राखीव खेळाडूंमध्ये मुकेश कुमार, पृथ्वी शॉ, प्रविण दुबे, रिपल पटेल आणि अभिषेक पोरेल यांना संधी दिली आहे.

दरम्यान, हा सामना दोन्ही संघांसाठी वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाचा आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तसेच दिल्लीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे, त्याचमुळे त्यांचा हा अखेरचा सामना आहे. त्यामुळे ते शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रिली रोसौ, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एन्रिच नॉर्किया

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक / कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Closure: वास्को वाहतुकीत मोठे बदल! रेल्वे अंडरब्रिज 6 दिवसांसाठी बंद, पोलिसांनी दिलाय पर्यायी मार्ग; Watch Video

Terrorist Masood Azhar: 'मी एलन मस्क आणि मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत, जिहादसाठी पैशाची कमी नाही...' दहशतवादी मसूद अजहरच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा करणार संघाचे नेतृत्त्व

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT