IPL 2023: आज बदलणार Playoff ची गणितं! चेन्नई-लखनऊ करणार थेट क्वालिफाय? पाहा समीकरणे

आयपीएल 2023 स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या DC vs CSK आणि KKR vs LSG सामन्यांनंतर प्लेऑफची गणिते बदलणार आहेत.
MS Dhoni| Krunal Pandya
MS Dhoni| Krunal PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 Playoff Equation: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने रंगणार आहे. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सुरू होईल, तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, या सामन्यांनंतर प्लेऑफची अनेक गणिते बदलण्याची शक्यता आहे. सध्या प्लेऑफमध्ये केवळ गुजरात टायटन्सने स्थान पक्के केले आहे. पण अन्य तीन जागांसाठी अद्याप चूरस आहे. तसेच शनिवारी सामने खेळणाऱ्या एकूण चार संघांपैकी दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपले आहे. पण अन्य तिन्ही संघ प्लऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

MS Dhoni| Krunal Pandya
Jos Buttler 5th Duck: बटलरची डकची हॅटट्रीक! IPL इतिहासात 'हा' नकोसा रेकॉर्ड करणारा पहिलाच फलंदाज

चेन्नई - लखनऊ ठरू शकतात प्लेऑफसाठी पात्र

चेन्नई आणि लखनऊ हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत प्रत्येकी 15 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये थेट प्रवेश करण्याची संधी आहे.

कारण जर या दोन्ही संघांनी शनिवारी होणारे आपापले अखेरचे साखळी सामने जिंकले, तर त्यांचे 17 गुण होतील. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

मात्र, चेन्नई आणि लखनऊ या संघांपैकी एकाने किंवा दोन्ही संघांनी पराभव स्विकारला, तर मात्र या दोन्ही संघांना रविवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल. यामध्ये त्यांना अपेक्षा असेल बेंगलोर आणि मुंबईने पराभव स्विकारावा.

MS Dhoni| Krunal Pandya
IPL 2023, DC vs CSK: चेन्नईविरुद्ध दिल्ली 'या' गोष्टीत करणार मोठा बदल, अखेरच्या मॅचआधी घोषणा

कोलकाता समोर कठीण मार्ग

तसेच कोलकाता संघासमोरचा मार्ग सोपा नाही. ते प्लेऑफमधील शर्यतीत अद्याप कायम असले तरी त्यांना अन्य संघांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. त्यांना लखनऊवर कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने मात करावी लागणार आहे, जेणेकरून 14 गुण होतील, त्याचबरोबर नेट रन रेटही सुधारेल.

तसेच बेंगलोर आणि मुंबईने त्यांच्या रविवारी होणाऱ्या सामन्यांमध्ये मोठा पराभव स्विकारावा, अशी अपेक्षा ठेवावी लागेल. तसेच त्यांना अशीही अपेक्षा करावी लागेल की राजस्थान रॉयल्सचाही नेट रन रेट त्यांच्यावर भारी पडू नये.

राजस्थानचे सर्व 14 साखळी सामने खेळून पूर्ण झाले आहे. पण त्यांचे सध्या १४ गुण असल्याने त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अपेक्षा आहे की कोलकाताने पराभूत व्हावे, त्याचबरोबर बेंगलोर आणि मुंबईने त्यांच्या रविवारी होणाऱ्या सामन्यांमध्ये मोठा पराभव स्विकारावा.

बेंगलोर आणि मुंबई देखील करू शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश

त्याचबरोबर बेंगलोर आणि मुंबई यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना अशीही अपेक्षा असेल की चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी किंवा किमान एका संघाने तरी त्यांचे अखेरचा साखळी सामने पराभूत व्हावे.

तसेच जर बेंगलोर आणि मुंबई यांच्यातील एका संघाने जर विजय मिळवला आणि एकाने पराभव स्विकारला, तर मात्र जो संघ विजय मिळवेल, तो सहज प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवेल. तसेच जर दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला, तर मात्र नेट रन रेटवर प्लेऑमध्ये कोणाला प्रवेश मिळेल, याचा निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com