Nitish Rana and Rinku Singh
Nitish Rana and Rinku Singh Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रिंकू-राणाच्या पार्टनरशीपमुळे कोलकाताने मारलं चेन्नईचं मैदान! धोनीच्या CSK ला पराभवाचा धक्का

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 61 वा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला गेला. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर 145 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने सुरुवातीला 3 विकेट्स झटपट गमावल्यानंतर रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी 99 भागीदारी केली. त्यामुळे कोलकाताने हे आव्हान 18.3 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

या सामन्यात चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाताकडून सलामीला जेसन रॉय आणि रेहमनुल्लाह गुरबाज उतरले होते. पण गुरबाजला पहिल्याच षटकात दीपक चाहरने 1 धावेवर बाद केले. त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकात चाहरनेच वेंकटेश अय्यरला माघारी धाडले. अय्यर 9 धावाच करू शकला.

चाहरने कोलकाताला पाचव्या षटकात तिसरा धक्का दिला. त्याने जेसन रॉयला 12 धावांवर बाद केले. त्यामुळे कोलकाता 33 धावा 3 बाद अशा कठीण परिस्थितीत अडकले होते. असे असतानाच कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांची जोडी जमली.

या दोघांनीही संयमी खेळ करताना खराब चेंडूना सीमापार पाठवत चेन्नईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दरम्यान, राणाला त्याचा एक झेल पाथिरानाकडून सुटल्याने जीवदानही मिळाले होते. त्याचा राणाने चांगला उपयोग केला.

राणा आणि रिंकूमध्ये शतकी भागीदारी होईल असे वाटत असतानाच रिंकू धावबाद झाला. त्यामुळे त्यांची 99 धावांची भागीदारी तुटली. रिंकूने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. अखेर राणाने कोलकाताला विजयापर्यंत पोहचवले. राणा 44 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. आंद्र रसेल 2 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋतुराजला 17 धाावंवर वरुण चक्रवर्तीने बाद केले.

नंतर कॉनवेची साथ देण्यासाठी अजिंक्य रहाणे आला. या दोघांचीही जोडी चांगली जमली होती. पण ही जोडी धोकादायक ठरणार नाही, याची काळजी चक्रवर्तीने घेतली आणि त्याने 8 व्या षटकात रहाणेला १६ धावांवर माघारी धाडले.

पाठोपाठ कॉनवे 10 व्या षटकात 30 धावा करून बाद झाला, तर अंबाती रायुडू ११ व्या षटकात 4 धावांवर बाद झाला. मोईन अलीही स्वस्तात माघारी परतला त्यालाही 1 धावच करता आली. मोईन आणि रायुडूला सुनील नारायणने 11 व्या षटकातच त्रिफळाचीत केले होते.

पण नंतर रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला आणि चेन्नईला 140 धावांचा आकडा पार करून दिला. या दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी झाली. मात्र जडेजा अखेरच्या षटकात वैभव अरोराविरुद्ध बाद झाला. त्याने 20 धावा केल्या.

अखेरीस एमएस धोनी मैदानात आला, पण त्याला २ धावाच करता आल्या. तसेच शिवम दुबे 34 चेंडू 48 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 144 धावाच करता आल्या.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच वैभर अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT