RCB
RCBDainik Gomantak

IPL 2023: बेंगलोरच्या बॉलर्सची कमाल, राजस्थान 59 धावांवर ऑलआऊट! RCB ने विजयासह कायम राखले आव्हान

रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला ५९ धावांवर सर्वबाद करत दणदणीत विजय मिळवला.

Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना होत आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात या सामन्यात बेंगलोरने तब्बल 112 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे बेंगलोरने प्लेऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले आहे. मात्र राजस्थानच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यात बेंगलोरने राजस्थानसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकातच 59 धावांवर सर्वबाद झाला. राजस्थानकडून केवळ शिमरॉन हेटमायर आणि जो रुट या दोघांनाच दोनआकडी धावसंख्या पार करता आला.

RCB
IPL 2023: अंपायरशी भांडण क्लासेनला भोवलं! BCCI ने केली कडक कारवाई, मिश्रालाही खडसावलं

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात वेन पार्नेलने राजस्थानला दोन मोठे धक्के दिले. त्याने जॉस बटलरला मोहम्मद सिराजकरवी शुन्यावर झेलबाद केले. तसेच कर्णधार संजू सॅमसनला 4 धावांवर बाद केले.

त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण पडिक्कल ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पडिक्कल 4 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ जो रुटही १० धावा करून पार्नेलच्या चेंडूवर पायचीत झाला.

त्यानंतर एक बाजू शिमरॉन हेटमायरने सांभाळली होती, पण त्याचवेळी ध्रुव जुरेल (1) आणि आर अश्विन (0) यांच्या विकेट स्वस्तात गेल्या. दरम्यान, चांगल्या खेळणाऱ्या हेटमायरला ग्लेन मॅक्सवेलने 10 व्या षटकात माघारी धाडले. हेटमायरने 19 चेंडूत 35 धावांची खेळी केली. यानंतर मात्र तळातील फलंदाज फार काही करू शकले नाही आणि 11 व्या षटकाच्या आतच राजस्थानचा संघ सर्वबाद झाला.

बेंगलोरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. बेंगलोरकडून वेन पार्नेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

RCB
IPL Video Viral: 6,6,6,6,6... स्टॉयनिस-पूरनचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 31 धावा चोपत फिरवली मॅच

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 50 धावांची भागीदारीही केली. पण विराट 18 धावांवर बाद झाला.

पण त्यानंतर डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शानदार खेळ करत 69 धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान डू प्लेसिसने अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर 44 चेंडूत 55 धावांची खेळी करून डू प्लेसिस बाद झाला. यानंतर महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या.

त्यांच्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही अर्धशतक करून बाद झाला. मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावांची खेळी केली. अखेरीस अनुज रावतने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यामुळे बेंगलोरने 20 षटकात 5 बाद 171 धावा उभारल्या. रावत 11 चेंडूत 29 धावांवर नाबाद राहिला. तसेच मायकल ब्रेसवेल 9 धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानकडून ऍडम झम्पा आणि केएम असिफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्माने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com