IPL Mega Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: आयपीएल लिलावाची तारीख बदला, फ्रँचायझींची BCCI कडे मागणी

IPL Auction 2023 कोची येथे 23 डिसेंबर रोजी होणार आहे. पण या लिलावाची तारीख बदलण्याची मागणी फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे केली आहे.

दैनिक गोमन्तक

IPL Auction 2023: आयपीएल 2023 हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कोची येथे 23 डिसेंबर रोजी होणार आहे. हा लिलाव छोट्या स्वरुपातील असणार आहे. मात्र, लिलावाच्या तारखेमुळे फ्रँचायझींच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते. कारण त्याचदरम्यान नाताळ हा सणही असल्याने त्यांचे काही परदेशी सदस्य या लिलावासाठी अनुपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिपोर्ट्सनुसार फ्रँचायझींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) लिलावाची तारीख बदलण्याची विनंती केली आहे, जेणेकरून फ्रँचायझींचे महत्त्वाचे सदस्य लिलावासाठी उपस्थित राहू शकतील. पण अद्याप याबद्दल बीसीसीयने अधिकृतरित्या कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

दरम्यान, लिलावापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता फ्रँचायझी आगामी लिलावासाठी तयारी करत आहेत. एकूण 10 आयपीएल फ्रँचायझींनी मिळून आयपीएल 2023 हंगामासाठी 163 खेळाडूंना संघात कायम केले आहे, तर 85 खेळाडूंना मुक्त केले आहे. मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये केन विलियम्सन (Kane Williamson), अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, मयंक अगरवाल, निकोलस पूरन अशी काही मोठ्या खेळाडूंची नावे सामील आहेत.

तसेच आगामी आयपीएल लिलावात मुक्त केलेल्या खेळाडूंबरोबरच गेल्या हंगाम न खेळलेली अन्य काही मोठी नावेही दिसण्याची शक्यता आहेत. यात बेन स्टोक्स, सॅम करन यांसारख्या खेळाडूंची चर्चा आहे. त्यामुळे आता फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

त्याचबरोबर आयपीएल 2023 लिलावासाठी फ्रँचायझींच्या पर्स रकमेत 5 कोटींची वाढही करण्यात आली आहे. त्यामुळे फ्रँचायझींच्या खेळाडूंना मुक्त केल्यानंतर उर्वरित रकमेत आता 5 कोटींची वाढ होईल. हा लिलाव एकाच दिवसात पूर्ण होईल. यापूर्वी आयपीएल (IPL) 2022 साठी याचवर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेला लिलाव दोन दिवस झाला होता. पण तो मोठ्या स्वरुपाचा लिलाव होता. मात्र, आगामी लिलाव छोटा असल्याने एक दिवसात पूर्ण होईल.

तसेच आयपीएल 2023 हंगामातील सामने घरचे मैदान आणि प्रतिस्पर्ध्यांचे मैदान (Home and Away) स्परुपात खेळवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. असे झाल्यास पुढच्या वर्षी भारतभरात अनेक ठिकाणी आयपीएलचे सामने पाहायला मिळू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT