

BCCI Tribute to Players : खेळाडू म्हणून मिळवलेले अलौकिक यश, प्रशिक्षक म्हणून ज्युनियरपासून सिनियर्सपर्यंत केलेले कार्य तसेच दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या टी-२० विश्वविजेतेपदातील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सातत्यपूर्ण आणि महान कार्याचा गौरव बीसीसीआय करणार आहे. त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे बीसीसीआयकडून अधिकृतपणे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेबीसीसीआयचा हा सत्कार सोहळा येत्या रविवारी नवी दिल्लीत होणार आहे. त्या वेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये मिळवलेल्या टी-२० विश्वविजेतेपद, चॅम्पियन्स अजिंक्यपदाच्या संघांसह आता रविवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या टी-२० विश्वकरंडक विजेत्या संघासह महिला विश्वविजेत्या संघाचाही गौरव केला जाणार आहे.
या गौरवसोहळ्यात विशेष पुरस्कारही देण्यात येणार आहे. ‘दी वॉल’ म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ठसा उमटवणाऱ्या द्रविड यांनी त्यानंतर भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडवण्याचा विडा उचलला. काही वर्षे तर १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ कर्णधार असलेल्या संघाने १९ वर्षांखालील विश्वविजेतेपद मिळवले होते, त्या संघात शुभमन गिल याचाही समावेश होता.
याच शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवले जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघात शुभमन गिलचा समावेश नव्हता; परंतु गेल्या वर्षात त्याने कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात केलेली कामगिरी फारच लक्षवेधक ठरली आहे.
गिलने वर्षात कसोटी सामन्यांत ९८३ धावांचा पाऊस पाडला. यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ७० धावांच्या सरासरीने ७५४ धावा फटकावल्या. तर एकदिवसीय प्रकारात त्याने ४९० धावा टोलावल्या. दुबईत जिंकलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याचे योगदान १८८ धावांचे होते. एकूणच गिलने २०२५ मध्ये सर्व प्रकारात मिळून ४९च्या सरासरीने १,७६४ धावा फटकावल्या. यात सात शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
राहुल द्रविड ः
जीवनगौरव पुरस्कार (पुरुष)
मिताली राज ः
जीवनगौरव पुरस्कार (महिला)
आयुष म्हात्रे ः
लाला अमरनाथ पुरस्कार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.