Kieron Pollard: धडाकेबाज बॅट्समन किएरॉन पोलार्डची IPL मधून निवृत्ती

मुंबई इंडियन्स संघाकडून बॅटिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती
Kieron Pollard
Kieron Pollard Dainik Gomantak
Published on
Updated on

Kieron Pollard: वेस्टइंडिजचा धडाकेबाज फलंदाज किएरॉन पोलार्ड याने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये पोलार्डचा झंजावात पाहता येणार नाही. तथापि, गेल्या 13 वर्षांपासून मुंबई इंडियन्स या फ्रँचायजीकडून खेळणाऱा पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच असणार आहे. पोलार्ड 2010 मध्ये मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता. (Kieron Pollard Announces Retirement from IPL)

Kieron Pollard
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपचा 20 नोव्हेंबरपासून थरार; जाणून घ्या स्पर्धेविषयी सर्व काही...

पोलार्डने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यने म्हटले आहे की, हा माझ्यासाठी कठिण निर्णय होता. दीर्घ चर्चेनंतर मी निर्णयाप्रत पोहचलो आहे. मी आता आयपीएल खेळणार नाही. मुंबई इंडियन्ससोबत खेळणार नसेन तर कुणाकडूनच खेळणार नाही. मी मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. या सर्व संघांमध्ये किएरॉन पोलार्डचा समावेश होता. 35 वर्षीय पोलार्डने 7 महिन्यांपुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.

Kieron Pollard
IND vs NZ: भारताविरुद्धच्या वनडे अन् टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा !

दरम्यान, पोलार्डने गेल्या 13 वर्षात मुंबई इंडियन्ससाठी 3412 धावा केल्या आहेत, तर 69 विकेटही त्याने घेतल्या आहेत. पोलार्डने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 101 टी-20 आणि 123 वन डे सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 26.01 च्या सरासरीने 2706 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये त्याने 25.30 च्या सरासरीने 1569 धावा केल्या. पोलार्डने वनडे मध्ये 55 तर टी-20 मध्ये 42 विकेट घेतल्या. 2019 मध्ये त्याने वेस्टइंडिजचे कर्णधारपदही सांभाळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com