Pitch Curator Sunil Chauhan, IPL Cricket 2022 News updates Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: पुण्याचे पीच तयार करणार 'पहाडी' माणूस

बीसीसीआयने पुण्याच्या मैदानाची जबाबदारी सुनील चौहान यांच्याकडे सोपवली आहे.

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) पिच क्युरेटर सुनील चौहान (Sunil Chauhan) येत्या IPL2022 मध्ये काम करणार आहे. बीसीसीआयने पुण्याच्या मैदानाची जबाबदारी सुनील चौहान यांच्याकडे सोपवली आहे. 15 मार्चला ते पुण्यासाठी रवाना झाले. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर आयपीएलचे 15 सामने होणार आहेत. जवळपास दोन महिने सामने होईपर्यंत सुनील चौहान तिथेच राहणार आहेत. पहिला सामना 29 मार्च रोजी पुण्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. 14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम साखळी सामना होईल. सुनील चौहान यांनी एमसीएच्या मैदानात पहिल्यांदाच खेळपट्ट्या तयार करणार आहेत. यापूर्वी त्यांनी धर्मशाला स्टेडियमव्यतिरिक्त राजकोट स्टेडियम, फिरोजशाह कोटला मैदानासह इतर स्टेडियममध्ये काम केले आहे. (IPL 2022 News updates)

1992 पासून कार्यरत

क्रिकेट खेळण्याचा शौकीन सुनील चौहान 1992 पासून मैदानाची खेळपट्टी आणि आऊटफिल्ड बनवण्याचे काम करत आहे. त्यांनी धर्मशाळा, बिलासपूर आणि अमतर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड तयार केले आहेत. 2012 मध्ये त्यांना बीसीसीआयचे (BCCI) पिच क्युरेटरचे प्रमाणपत्र मिळाले.

आता ते महाराष्ट्रातील पुण्याच्या स्टेडियमवर (IPL) पहिल्यांदाच काम करणार आहेत. तेथे गेल्यानंतर खेळपट्ट्या आणि आऊटफिल्ड कसे तयार करायचे हे ठरवले जाईल. बीसीसीआयने मेलद्वारे त्यांना संदेश पाठवून पुण्याच्या मैदानावर त्यांची ड्युटी लावली आहे. त्यासाठी ते कालच पुण्यासाठी रवाना झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT