Six hit by Rajat patidar injured one uncle in the stands
Six hit by Rajat patidar injured one uncle in the stands Twitter
क्रीडा

रजतने पंजाबविरुद्ध मारला जीवघेणा षटकार, थोडक्यात वाचला चाहत्याचा जीव!

दैनिक गोमन्तक

RCB vs PBKS: IPL 2022 मध्ये, पंजाब किंग्जचा शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 9 गडी गमावून 209 धावा केल्या. पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 29 चेंडूत 66 धावा केल्या. त्याचवेळी लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावांची खेळी केली. 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात फारशी खास झाली नाही. आरसीबीच्या डावाच्या 9व्या षटकात रजत पाटीदारने 102 मीटरचा षटकार ठोकला. यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या एका वृद्धाच्या डोक्याला चेंडू लागला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मॅक्सवेलने 35 धावा केल्या

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात काही खास झाली नाही. चौथ्या षटकात विराट कोहली 14 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 5 व्या षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिस 8 चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. त्याच षटकात महिपाल लोमर 6 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. 11व्या षटकात रजत पाटीदार 21 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 22 चेंडूत 35, दिनेश कार्तिकने 11 चेंडूत 11, शाहबाज अहमदने 14 चेंडूत 9, हर्षल पटेलने 7 चेंडूत 11 धावा आणि वनिंदू हसरंगाने 3 चेंडूत 1 धावा केल्या. आरसीबीला 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावाच करता आल्या. पंजाबने हा सामना 54 धावांनी जिंकला.

रजतची प्राणघातक छटकार

या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा (RCB) फलंदाज रजत पाटीदारने 21 चेंडूत 26 धावा केल्या. या डावात त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 2 शानदार षटकार आले. यातील एक षटकार चर्चेत आहे. या षटकारामुळे एका क्रिकेटप्रेमींला दुखापत झाली. हरप्रीत ब्रार बेंगळुरूच्या डावातील 9वे षटक करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रजतने लाँग ऑनच्या दिशेने एक षटकार मारला, हा फटका स्टँडवर बसलेल्या वृद्ध चाहत्याच्या डोक्याला लागला, जो पाहून खेळाडूही चिंतेत पडले. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT