FC Goa
FC Goa Dainik Gomantak

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाचा विजय

वास्को स्पोर्टस क्लबवर दोन गोलने विजय
Published on

पणजी : एफसी गोवा संघाने अखेरच्या साखळी लढतीत वास्को स्पोर्टस क्लबवर 2-0 फरकाने मात करत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. सामना शुक्रवारी साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर झाला.

FC Goa
प्रीमियर लीगमध्ये संयमी समरमुळे ‘जीनो’ची बाजी

एफसी गोवाच्या स्पर्धेतील मोहिमेची समाप्ती विजयाने करताना माल्सॉमत्लुआंगा व रायन मिनेझिस यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. त्यांचे स्पर्धेत 27 गुण झाले. स्पर्धेत यापूर्वीच धेंपो स्पोर्टस क्लबने विजेतेपद, तर साळगावकर एफसीने उपविजेतेपद मिळविले आहे.

एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाला तासाभराच्या खेळानंतर गोल नोंदविण्यात यश आले. बदली खेळाडू माल्सॉमत्लुआंगा याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर सामन्याच्या भरपाई वेळेत रायन मिनेझिसने मोसमातील पहिला गोल नोंदवत एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग व गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत मिळून एफसी गोवाचा हा सलग चौथा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com