IPL 2022|'करो या मरो' हैदराबाद अन् कोलकाता उद्या आमने-सामने

कोलकाता आकडेवारीत पुढे, सनरायझर्स हैदराबादचं काय
who will win srh vs kkr ipl match prediction previous match
who will win srh vs kkr ipl match prediction previous matchDanik Gomantak
Published on
Updated on

कोलकाता नाईट रायडर्ससाठी पुढील सामना महत्त्वाचा आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर या संघालाही मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना केवळ गुणांची गरज नाही तर रनरेटचीही गरज आहे. पराभवाने हैदराबादच्या आशा अबाधित राहतील, पण कोलकाता हरले तर संपेल. (who will win srh vs kkr ipl match prediction previous match)

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी हा सामना पुण्यात होणार आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. याआधी 15 एप्रिलला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. कोलकाताने प्रथम खेळताना 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 7 विकेट्स राखून विजय मिळवला होता.

who will win srh vs kkr ipl match prediction previous match
राहुल भट हत्येचा तपास एसआयटी करणार, पत्नीला सरकारी नोकरी

कोलकाता आकडेवारीत पुढे आहे

आयपीएलमधील दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. यामध्ये केकेआरने 14 तर सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत.

दोन माजी आयपीएल चॅम्पियन्समधील शेवटच्या 5 लढतींवर नजर टाकल्यास, कोलकाता नाईट रायडर्सची कड सनरायझर्स हैदराबादवर 4-1 ने जड दिसते. म्हणजेच कोलकाताने 4 सामने जिंकले असून सनरायझर्सने केवळ 1 सामना जिंकला आहे.

KKR सोबत इतिहास

इतिहास पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सचा आहे. पण, वर्तमान काय म्हणते? सनरायझर्सची स्थिती थोडी बरी दिसत आहे. केकेआरच्या संघासमोर दुखापती ही समस्या असल्याचे दिसते. गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर आहे. त्याचबरोबर कोलकाताची फलंदाजीही खराब आहे. दुसरीकडे, सनरायझर्सचा संघ कोलकात्यापेक्षा थोडा मजबूत दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com