IPL 2022 Retention: list of all retained playe Dainik Gomantak
क्रीडा

धोनी, विराटपेक्षाही पंत आणि जडेजा महाग,जाणून घ्या कुठल्या संघाने कुणाला केले रिटेन

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायझर्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात 4 खेळाडू कायम ठेवले आहेत.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 Retention अंतर्गत, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे काल जाहीर केली आहेत. विराट कोहली (Virat Kohli), एमएस धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), केन विल्यमसन (Kane Williamson) यांसारख्या मोठ्या नावांना कायम ठेवण्यात आले आहे, तर राशिद खान, डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, इऑन मॉर्गन, शिखर धवन या खेळाडूंना त्यांच्या संघाने सोडले आहे. या रिटेन्शनमध्ये गंमत अशी घडली की विराट कोहली आणि धोनीचा पगार कमी झाला, तर रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना आता या दोन दिग्गजांपॆक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.

4 संघांनी त्यांचे सर्व 4 खेळाडू कायम ठेवले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायझर्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात 4 खेळाडू कायम ठेवले आहेत. तर आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने 3-3 खेळाडूंना कायम ठेवले. पंजाब किंग्जने त्यांच्यासोबत किमान 2 खेळाडू कायम ठेवले आहे . (IPL 2022 Retention: list of all retained playe)

मुंबईत रोहितच

मुंबई इंडियन्सने आपले 4 खेळाडू कायम ठेवले आहेत. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे. रोहित शर्माला 16 कोटी, जसप्रीत बुमराहला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईने कायरन पोलार्डपेक्षा सूर्यकुमार यादवला जास्त पैसे दिले आहेत. सूर्यकुमार यादव - 8 कोटी आणि किरॉन पोलार्डला 6 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

RCB सोबत विराट कायम तर चहल नसणार ?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 खेळाडूंना कायम ठेवले. ज्यामध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. विराट कोहलीला वर्षाला 15 कोटी रुपये मिळतील. ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी आणि मोहम्मद सिराजला 7 कोटी मिळतील. वृत्तानुसार, युझवेंद्र चहल आणि आरसीबीचे पैशावर एकमत नव्हते, त्यामुळे त्यांना कायम ठेवण्यात आले नाही.

CSK चा बॉस धोनीचं मात्र जडेजा महागडा

चेन्नई सुपर किंग्जने धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना कायम ठेवले. मोठी गोष्ट म्हणजे रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे देऊन कायम ठेवण्यात आले आहे. जडेजाला वार्षिक 16 कोटी रुपये मिळतील. धोनी 12 कोटी, मोईन अली 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाड 6 कोटींमध्ये चेन्नईकडे आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे 4 खेळाडू कायम

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला 16 कोटी, अक्षर पटेलला 9 कोटी, पृथ्वी शॉला 7.50 कोटी आणि एनरिक नोरखियाला 6.50 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. दिल्लीने शिखर धवन, कागिसो रबाडा, श्रेयस अय्यर, अश्विन या चॅम्पियन खेळाडूंना सोडले आहे.

KKR सोबत मॉर्गन नाही ?

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनला कायम ठेवले आहे. अष्टपैलू आंद्रे रसेलला 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले. त्याचवेळी व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना 8-8 कोटींसाठी कायम ठेवण्यात आले. सुनील नरेनला केवळ 6 कोटींमध्ये संघात कायम ठेवण्यात आले आहे.

RR चा अजब फैसला

राजस्थान रॉयल्सने अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सोडून सर्वांनाच चकित केले. संघाने 3 खेळाडूंना कायम ठेवले आहे. कर्णधार संजू सॅमसन - 14 कोटी, जोस बटलर - 10 कोटी आणि यशस्वी जैस्वाल - 4 कोटींमध्ये राखले गेले.

कोणत्या संघाकडे किती पैसा ?

आयपीएल 2022 मेगा लिलावात पंजाब किंग्ज सर्वाधिक 72 कोटी रुपये घेणार आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या खिशात 68 कोटी रुपये शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पर्समध्ये 57 कोटी रुपये शिल्लक आहेत. KKR, मुंबई आणि चेन्नईच्या पर्समध्ये 48-48 कोटी रुपये शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्स 62 कोटींसह मेगा लिलावात उतरणार आहे. त्याच वेळी, दिल्लीच्या पर्समध्ये सर्वात कमी 47.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT