इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढील हंगामासाठी नवीन संघांसह मेगा लिलावाची तयारी सुरु आहे. स्पर्धेचा भाग म्हणून 8 संघांना त्यांचे चार खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. याशिवाय उर्वरित खेळाडूंना अॅक्शनमध्ये उतरावे लागणार आहे. पंजाब किंग्जची (Punjab Kings) फ्रँचायझी टीम सोडण्याचा निर्णय घेतलेला कर्णधार केएल राहुल (KL Rahul) नव्या संघात सामील होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ संघ (Lucknow Team) त्याला आपला कर्णधार बनवू इच्छित आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर केएल राहुल हा अतिशय प्रतिभावान फलंदाज असल्याने इतर अनेक प्रकारे संघासाठी तो योगदान देऊ शकतो. तो ओपनिंगही करु शकतो. संघातील त्याचे योगदान पाहता अनेक फ्रँचायझी संघ त्याला आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी तयार आहेत. सध्याच्या आठ संघांनी चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. रिलीज झालेल्या खेळाडूंमधून दोन नवीन संघ तीन खेळाडूंची निवड करु शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या नव्या मोसमात प्रवेश करणार्या लखनऊ संघाने राहुलला आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला मिळालेल्या रकमेपेक्षा सर्वाधिक मानधन देऊ केले आहे. 20 कोटी मानधन देण्याची ऑफर दिली आहे. इनसाइडस्पोर्टच्या म्हणण्यानुसार, लखनऊ संघाची मालकी मिळवलेल्या आरपीएसजी समूहाने राहुलला संघात येण्याची ऑफर दिली आहे. आरपी राजीव गोएंका (Rajiv Goenka) यांनी 7000 कोटींची मोठी रक्कम देऊन संघ मिळवलेला आहे.
राहुल हा सर्वात महागडा खेळाडू असेल
राहुल इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरणार आहे. जर त्याने लखनौ संघाच्या कर्णधारपदाची ऑफर स्वीकारली तर वेतन म्हणून 20 कोटी रुपये त्याला दिले जातील. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचे कर्णधार असलेला विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. 2018 ते 2018 पर्यंत त्यांचा पगार 18 कोटी रुपये होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.