IPL 2022 DD vs RR  Dainik Gomantak
क्रीडा

चुकीला माफी नाही; कर्णधार पंत सह 3 जणांकडून IPLने आकारला दंड

IPL 2022 आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant), वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. पंतला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला तर ठाकूरला 50 टक्के आणि अमरेला 100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली. हे प्रकरण IPL-2022 मध्ये दिल्ली आणि राजस्थान यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्याच्या वेळीचे आहे. आयपीएलने शनिवारी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (IPL 2022 Punishment of 3 persons including captain Rishabh Pant will also take money)

वास्तविक, 20 व्या षटकातील तिसरा चेंडू राजस्थानचा गोलंदाज ओबेद मॅकॉयने फुल टॉस टाकला होता. त्यावर दिल्लीचा फलंदाज रोव्हमन पॉवेलने षटकार ठोकला होता. हा चेंडू कमरेच्या वरचा फुल टॉस आहे, त्यामुळे त्याला नो बॉल द्यावा, असे दिल्ली संघाने सांगितले आणि मात्र, मैदानावरील पंचांना तसे वाटले नाही, यामुळे पंत चिडला आणि चौथ्या पंचाशी तो सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या पंचाशी वाद घालू लागला आणि त्या वेळी ठाकूर सोबत होते. अमरे यांनी एक पाऊल पुढे जाऊन मैदानावर येऊन पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली होती.

तर तिघांनीही आपली चूक कबूल केली

आयपीएलनुसार, पंतने कलम 2.7 अंतर्गत लेव्हल-2 चा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, ठाकूर यांनी कलम 2.8 अन्वये लेव्हल-2 आणि अमरे यांनी कलम 2.2 अन्वये लेव्हल-2 चा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी आपली चूक मान्य केली असून शिक्षाही मान्य केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT