आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात बराच वाद झाला. हा वाद इतका वाढला की, कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या फलंदाजांना माघारी बोलावण्याचे संकेत दिले. सामन्यातील शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दिल्लीच्या रोव्हमन पॉवेलने (Rowman Powell) राजस्थानचा गोलंदाज ओबेद मॅकॉयला षटकार ठोकला. हा चेंडू फुल टॉस होता. अशा स्थितीत दिल्लीने हा नो बॉल असल्याचे म्हटले. परंतु मैदानावरील पंचांनी तो योग्य चेंडू असल्याचे म्हटले. यातूनच वाद वाढला आणि पंत बुवा संतापले. त्याने आपल्या फलंदाजांना क्रिझ सोडण्याचे संकेत दिले, परंतु संघाचे सहायक प्रशिक्षक शेन वॉटसन (Shane Watson) यांनी तसे होऊ दिले नाही. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. पॉवेलने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले आणि तिसऱ्या चेंडूवरही सहा धावा घेतल्या. हा चेंडू नो बॉल असता तर दिल्लीला तीन चेंडूत 17 धावा काढाव्या लागल्या असत्या. तसेच पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाला असता. परंतु तसे झाले नाही. दिल्लीने हा सामना 15 धावांनी गमावला. (Video Viral: Shane Watson gets angry with Rishabh Pant)
पंतने वॉटसनसमोर झुकला
पंत डगआऊटजवळ उभ्या असलेल्या चौथ्या पंचाशी बोलत होता. दरम्यान पंचानी नो-बॉल दिल्यानंतर तो निराश झाला. त्याचवेळी पॉवेल आणि कुलदीप यादव मैदानावरील पंचांशी बोलत होते. दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनीही धावत जाऊन पंचांशी संवाद साधला. दरम्यान, पंतने आपल्या फलंदाजांना परत येण्याचे संकेत दिले. त्यानंतर पॉवेल आणि कुलदीप परत येऊ लागले. परंतु पंतची ही कृती पाहता वॉटसन चांगलाच संतापला. त्याने पंतला फटकारले. यानंतर पंतने आपल्या फलंदाजांना माघारी बोलावण्याचे टाळले.
वॉटसनने आपली बाजू मांडली
सामना संपल्यानंतर वॉटसन म्हणाला की, आम्ही पंचाचा निर्णय स्वीकारला पाहिजे. वॉटसन पुढे म्हणाला, ‘‘शेवटच्या षटकात जे घडले ते खूपच निराशाजनक होते. दुर्दैवाने, आम्ही त्या स्थितीत होतो कारण आम्ही बऱ्याच वेळासाठी गोष्टी व्यवस्थित ठेवू शकलो नाही. शेवटी, दिल्ली कॅपिटल्समध्ये जे घडले त्याबद्दल तुम्ही पाहिले. पंचाचा निर्णय योग्य असो वा अयोग्य, तो आपल्याला मान्य करावा लागतो."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.