Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग आठ सामने गमावले आहेत आणि आता टीम IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे.

दैनिक गोमन्तक

गेली 14 वर्षे क्रिकेट चाहत्यांसाठी रंगत असलेला IPL सामन्यातील पाच वेळा चॅम्पियन राहिलेले मुंबई इंडियन्सला लीगच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 36 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सलग आठ सामने गमावले आहेत आणि आता टीम IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. लीगच्या इतिहासात मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश येण्याची ही सहावी वेळ. यापूर्वी 2008, 2009, 2016, 2018 आणि 2021 मध्ये ती प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाहीये. आयपीएल 2022 मधील खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला मान खाली खालण्याची वेळ आली आहे. (IPL 2022 Mumbai Indians out of playoff race)

आयपीएलच्या 15 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी म्हणून ओळखली जाणारी टीम, पण तीच टीम आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेली नाहीये. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांना यावेळीच्या मोसमात मोठी भागीदारी करता आलेली नाही. पहिल्या आठ सामन्यात रोहितने 153 तर इशानने 199 रन केल्या आहेत. संघाला ठोस सुरुवात न मिळाल्याने पुढे येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढत असून ते दबावाखाली त्यांची विकेट पडत आहे. लागोपाठ आठ सामने गमावल्यानंतर कर्णधार रोहितनेही कोणतीही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नसल्याची कबुली दिली आहे.

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सची गोलंदाजी म्हणून जो संघ ओळखला जातो, त्याचा धारदारपणा यावेळी किठेही दिसून येत नाही असं म्हणायला हरकत नाही. मोसमात 200 धावा केल्यानंतरही गोलंदाजांना त्याचा बचाव करता येत नाहीये. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इतर कोणत्याही गोलंदाजांची साथ मिळताना दिसत नाही. संघाला ट्रेंट बोल्टची उणीव राहिलच, जो सुरुवातीला नवीन चेंडूवर विकेट मिळवायचाच. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट आणि बेसिल थम्पीसारखे गोलंदाज खूप धावा करताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या अनुपस्थितीत मुंबई संघाला अष्टपैलू खेळाडूंची कमतरता भासत आहे. किरॉन पोलार्ड देखील एकटा काही विशेष करू शकत नाही, तो चेंडू आणि बॅटने आपली छाप सोडू शकत नाही. हार्दिक पांड्या आणि कृणाल इतर संघात गेल्याने मुंबई इंडियन्सला त्यांचा पर्याय शोधता आलेला नाहीये. खालून फळीमध्ये ज्या फलंदाजांचे नाव आहे ते देखील टीमसाठी स्फोटक खेळी खेळू शकत नाही असं दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT