Andrew Tye Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: लखनऊ संघाला Mark Wood ची मिळाली रिप्लेसमेंट, हॅट्ट्रिक घेणाऱ्याची एन्ट्री

आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तथापि, काही संघांना हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. लखनऊ सुपर जायंट्स हा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होत आहेत. मात्र लखनऊ संघाचा (Lucknow Team) आघाडीचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुडला (Mark Wood) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याचे नाव स्पर्धेतून मागे घेण्यात आले आहे. आता सर्व अटकळी आणि वेगवेगळ्या नावांनंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडच्या (England) वेगवान गोलंदाजाऐवजी दुसऱ्या खेळाडूची निवड केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने वुडच्या जागी ऑस्ट्रेलियाचा (Australia) मध्यमगती गोलंदाज अँड्र्यू टायचा (Name Mark Wood Replacement) समावेश केला आहे. (IPL 2022 Lucknow team replaces Mark Wood from Australia with Andrew Tye)

दरम्यान, अँड्र्यू टाय लखनऊमध्ये सामील झाल्याची अधिकृत घोषणा बुधवारी 23 मार्च रोजी आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आली. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) टाटा इंडियन प्रीमियर लीग 2022 साठी अँड्र्यू टायला मार्क वुडच्या जागी घेतली होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान वुडला दुखापत झाली होती.

पदार्पणातच हॅट्ट्रिक घेतली

अँड्र्यू टाय या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. तीच रक्कम लखनऊ त्याला या हंगामासाठी देणार आहे. अँड्र्यू टायला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. तो गेल्या हंगामात वेगवेगळ्या संघांसोबत होता. गुजरात लायन्सच्या जुन्या संघाशिवाय या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 27 आयपीएल सामन्यांमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत. टायने 2017 मध्ये गुजरातकडून पदार्पण केले आहे. पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिकसह 5 विकेट घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT