CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: CSKला फटका, सराव करताना प्रमुख खेळाडूला झाली दुखापत

CSKच्या मागे यंदा दुखापतीचे ग्रहण लागलेले पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. आयपीएल 2022 त्यांना 8 सामन्यांत 6 पराभव पत्करावे लागले आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टाच्या मार्गावर आहे. CSKच्या मागे यंदा दुखापतीचे ग्रहण लागलेले पाहायला मिळत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीची 14 कोटींचा गोलंदाज दीपक चहरला दुखापत झाली. त्यानंतर अॅडम मिल्नेलाही माघार घ्यावी लागली आणि काल पंजाब किंग्सविरुद्धच्या (PBKS) लढतीपूर्वी अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali)ला सराव करताना दुखापत झाली आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या खेळाडूला आता आयपीएल 2022 मधील काही सामन्यांना मुकावे लागणार. ()

शनिवारी सराव करताना त्याला ही दुखापत झाली आहे. CSKला अद्याप मोईन अलीच्या दुखापतीच्या स्कॅन रिपोर्टचीच प्रतीक्षा आहे. त्यानंतर मोईन अली नेमक्या किती सामन्यांना मुकेल, हे चित्र स्पष्ट होणार आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध 21 एप्रिलला झालेल्या लढतीत मोईन अलीला अंतिम 11 मध्ये स्थान दिले गेले नव्हते. तसेच तो काल पंजाब किंग्सविरुद्धही सामना खेळला नाही. आयपीएल 2022 च्या सुरूवातीच्या पहिल्या सामन्याला त्याला व्हिसा न मिळाल्यामुळे सामन्याला मुकावे लागले होते.

मोईन अलीला 5 सामन्यांत 17.40 च्या सरासरीने 87 धावा करता आल्या आणि त्याने एकच विकेट घेतली. 2021 च्या चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात मोईन अलीने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने 357 धावांसह 6 विकेट्स घेतल्या. यंदा चेन्नई सुपर किंग्सचा संघ 8 सामन्यांत 2 विजय मिळवू शकला आहे.

दिपक चहर (दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार)

अॅडम मिल्ने (दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार)

डेव्हॉन कॉनवे (लग्नासाठी सुट्टीवर)

मोईन अली (दुखापतग्रस्त, 3-4 सामन्यांना मुकण्याची शक्यता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT