आयपीएलमध्ये (IPL 2022) प्रत्येक वर्षी कॅरेबियन फलंदाज पाहायला मिळतात. T20 चे स्पेशालिस्ट म्हटल्या जाणाऱ्या संघातील स्टार्स आयपीएलला रोमांचक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. तर त्याच्या पॉवर हीटिंगचे चाहते वेडे आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चा संघातील आंद्रे रसेल हा देखील अशाच फलंदाजांपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वतःहून सामना बदलण्याची ताकद आहे. (video viral Andre Russell broke chair after KKR defeat)
रसेल केकेआरचा एक महत्त्वाचा भाग आहे. केकेआरने यावर्षी कायम ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी तो ही एक आहे. आतापर्यंत IPL मध्ये त्याने 8 सामने खेळले असून त्यात त्याने 45.40 च्या सरासरीने 227 धावा केल्या आहेत. मात्र, त्याच्या संघाची स्थिती फारशी चांगली नसून रसेल संघाला विजय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मागील सामन्यात केकेआरला गुजरात टायटन्सविरुद्ध 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
सोशल मीडियावर रसेलचा व्हिडिओ व्हायरल
गुरुवारी केकेआरचा सामना दिल्ली कॅपिटल्स सोबत खेळला जाणार आहे. याआधी, संघ चांगलाच घाम गाळत आहे कारण हा विजय त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात जर पराभव झाला तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण होईल. या सामन्यासाठी रसेलही जोरदार सराव करताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या फलंदाजीमुळे अक्षरश: खुर्ची तुटली.
व्हिडिओमध्ये रसेल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने जोरदार फटकेबाजी केली आणि ज्यामुळे खुर्चीला मोठे छिद्र पडले आहे, यानंतर टीममेट ती खुर्ची पाहतो आणि तो ते छिद्र पाहून अचंबितच होऊन जातो. KKR चा शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आणि हा व्हिडिओ शेअर करताना कोलकाता नाइट रायडर्सने कॅप्शन लिहिले की, 'रसेलच्या प्रभावासाठी शेवटपर्यंत तुम्ही थांबा. यावेळी केकेआरला विजय आवश्यक आहे.
केकेआरला मागील चार सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाची सुरुवात चांगली झाली पण नंतर तो मार्गापासून दूर भटकला. आता त्याचे सहा सामने शिल्लक आहेत ज्यात त्याची कामगिरी प्लेऑफसाठीची त्याची दावेदारी निश्चित करणार आहे. गेल्या वर्षी, केकेआरची संघाची सुरुवात खराब झाली होती, परंतु नंतर उत्तरार्धात शानदार पुनरागमन करत प्लेऑफ आणि नंतर अंतिम फेरीत केकेआरने प्रवेश केला. मात्र, अंतिम फेरीत केकेआरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.