IPL 2021: RCB beat MI by 54 Runs, RCB bowler's take revenge Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: चहल,मॅक्सवेलची फिरकी तर हर्षलची हॅट्रीक, RCBच्या गोलंदाजांसमोर MI गारद !

IPL 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI) 54 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमन्तक

IPL 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI) 54 धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) सलग सात पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा पहिला विजय आहे. त्याचबरोबर आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.(IPL 2021: RCB beat MI by 54 Runs, RCB bowler's take revenge)

कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीने प्रथम खेळताना 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पहिल्या 10 षटकांत 2 गडी बाद 80 च्या आसपास धावा करणारा मुंबई इंडियन्स संघ 18.1 षटकांत 111 धावांवरच आल आउट झाला. आरसीबीकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Hershal Patel) चार बळी घेतले. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) तीन आणि ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) दोन बळी घेतले.

मात्र या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते RCB चे बॉलर. मुंबई सारख्या तगड्या टीमला अवघ्या 111 धावांवरच रोखण्याचे सारथ्य त्यांनी केले. रोहित, डिकॉक, पोलार्ड आणि पांड्या ब्रदर्स यांना हा सामना आपल्या बाजूने फिरवताच आला नाही त्याला कारणीभूत ठरले ते चहल आणि मॅक्सवेलची फिरकी गोलंदाजी तर हर्षल पटेलची हॅट्रीक.

आरसीबीच्या बॉलरनी अक्षरश मुंबईला गारद केलं. यात सर्वात जास्त मोलाचा वाट होता तो हर्षल पटेलचा. हर्षल पटेलने 17 धावांत चार बळी घेतले, ज्यात एका हॅट्रीकचाही समावेश आहे. चहलने 11 धावांत तीन आणि मॅक्सवेलने 23 धावांत दोन बळी घेतले.तर सिराजनेही एक विकेट घेत आपला वाटा या जिंकण्यात दिला आहे.

RCB कडून 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 6.4 षटकांत 57 धावांची भागीदारी केली होती. डी कॉकने 23 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या आणि युझवेंद्र चहलच्या हाती झेल दिला. यानंतर रोहित शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 28 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या होत्या.

या दोघांनंतर मुंबईचा एकही फलंदाज दुहेरी आकडा स्पर्श करू शकला नाही. यादरम्यान इशान किशन 01, सूर्यकुमार यादव 08, कृणाल पंड्या 05, किरण पोलार्ड 07 आणि हार्दिक पंड्या 03 धावांवर बाद झाले. यानंतर अॅडम मिलने आणि राहुल चाहर यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी बुमराह पाच धावांवर बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT