IPL 2021: विराटनंतर कोण होणार आरसीबीचा पुढील कर्णधार?

संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना मात्र असे वाटते की, डिव्हिलियर्स (AB de Villiers) आरसीबीचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पर्याय ठरणार नाही. तर डेल स्टेनच्या (Dale Steyn) मते, आरसीबी (RCB) कर्णधार म्हणून दीर्घकालीन खेळाडूकडे पाहिल.
भारतीय संघ (Indian Team) आणि आरसीबीचे (RCB) नेतृत्व कोण करणार याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याबद्दल आपले मत दिले आहे.
भारतीय संघ (Indian Team) आणि आरसीबीचे (RCB) नेतृत्व कोण करणार याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याबद्दल आपले मत दिले आहे.Dainik Gomantak

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या हंगामानंतर विराट कोहली (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) कर्णधारपद सोडणार आहे. दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच त्याने ही घोषणा केली होती. याआधी विराटने भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणाही केली होती. टी -20 विश्वचषकात तो शेवटच्या वेळी या छोट्या स्वरूपात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आणि आरसीबीचे नेतृत्व कोण करणार याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर यांनी याबद्दल आपले मत दिले आहे.

भारतीय संघ (Indian Team) आणि आरसीबीचे (RCB) नेतृत्व कोण करणार याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याबद्दल आपले मत दिले आहे.
IPL 2021: पराभवानंतर विराट नाराज, असे खेळल्यास टॉपच्या संघांमध्ये राहणे होईल अवघड

दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय खेळाडू एबी डिव्हिलियर्स आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याचे सांगितले जाते. संजय मांजरेकर यांना मात्र असे वाटते की, डिव्हिलियर्स आरसीबीचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पर्याय ठरणार नाही. एका मध्यमाशी बोलताना मांजरेकर म्हणाले, डिव्हिलियर्स किती वर्षे कर्णधार होऊ शकतो? त्यामुळे मला वाटते की जो कोणी कर्णधार असेल त्याला किमान 3 वर्षांची ऑफर दिली जाईल.

आरसीबीच्या नवीन कर्णधारासाठी कोहलीच्या जागी तीन नावे मांजरेकरांनी सुचविली आहेत. मांजरेकर म्हणाले, विराटनंतर व्यवस्थापन संघाचे नेतृत्व करण्यासाठी किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड वॉर्नर यापैकी एकाची निवड करू शकतो. तो म्हणाला, “पोलार्ड एक खेळाडू आहे ज्याच्याकडे नेतृत्वाची गुणवत्ता आहे. सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड वॉर्नर हे माझे तीन दावेदार आहेत.

भारतीय संघ (Indian Team) आणि आरसीबीचे (RCB) नेतृत्व कोण करणार याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याबद्दल आपले मत दिले आहे.
IPL 2021: दीपक हुड्डाने केले भ्रष्टाचारविरोधी तत्त्वांचे उल्लंघन? BCCI करणार तापसणी

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन मांजरेकर यांच्या मताशी सहमत आहे. डिव्हिलियर्स या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत. स्टेन म्हणाला, "एबी डिव्हिलियर्सकडे जाणे मला योग्य वाटत नाही. तो एक हुशार खेळाडू आहे, पण तो त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मला वाटते की तो एक महान नेता आहे. " स्टेनने मात्र पंजाब किंग्जचा सध्याचा कर्णधार केएल राहुलला संभाव्य आरसीबी कर्णधार म्हणून ऑफर केले आहे.

स्टेन म्हणाला, आरसीबी कर्णधार म्हणून दीर्घकालीन खेळाडूकडे पाहिल. केएल राहुल (KL Rahul) पुढील वर्षी होणाऱ्या IPL च्या लिलावात आरसीबीकडे परत येऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे आरसीबीचा पुढील कर्णधार म्हणून मी पाहत आहे. असे स्टेनने स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com