IOA-appointed ac-hoc panel named 13-member wrestling team for Zagreb Open:
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने नियुक्ती केलेल्या ऍड-हॉक पॅनेलने मंगळवारी (2 जानेवारी) क्रोएशियाला होणाऱ्या आगामी झाग्रेब ओपन स्पर्धेसाठी 13 कुस्तीपटूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.
काहीदिवसांपूर्वीच क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केल्यानंतर आयओएने ऍड-हॉक पॅनेलची नियुक्ती केली होती. या पॅनेलने आता आगामी स्पर्धेसाठी संघाचीही निवड केली आहे.
दरम्यान, झाग्रेब ओपनसाठी निवडलेल्या संघात 5 विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू नाहीत. बंजरंग पुनिया, अंतिम पांघसह आणखी तीन कुस्तीपटूंनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या पाचही जणांनी विविध कारणांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
हांगझाऊमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या अंतिम पांघल (53 किलो) आणि किरण (76 किलो), तसेच मानसी अल्हावट (57 किलो), पुजा गेहलोत (50 किलो) आणि बंजरंग पुनिया (65 किलो) या खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी माहिती दिली आहे की 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनला होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अंतिमने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तिला यंदाचा अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे.
झाग्रेब ओपन स्पर्धेसाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकूण 25 जणांचा ताफा क्रोएशियाला जाणार आहे. दरम्यान, चार महिला कुस्तीपटूंनी माघार घेतल्याने ऍड-हॉक पॅनेलने महिला फ्रिस्टाईलसाठ केवळ सोनम मलिक (62 किलो) आणि राधिका (68 किलो) या दोन खेळाडूंनाच निवडले आहे.
त्याचबरोबर पुरुषांच्या फ्रिस्टाईलसाठी अमन सेहरावत (57 किलो), यश (74 किलो), दीपक पुनिया (86 किलो), विकी (97 किलो) आणि सुमीत मलिक (125 किलो) यांचीही निवड केली आहे.
सध्या भारतीय कुस्तीमधील बरेच वाद समोर येत आहेत. बजरंग पुनियासह अनेक स्टार कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली कारवाई करण्याच्या मागणी केली आहे. त्याच प्रकरणात ब्रिजभूषण यांना अध्यक्षपद सोडावे लागले.
त्याचबरोबर नव्याने घेण्यात आलेल्या निवडणूकीतही ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह बबलू यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. याबद्दलही अंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी निषेध व्यक्त केला होता. आता भारताच्या कुस्ती संघटनेचे कामकाज आयओएची ऍड हॉक कमिटी पाहात आहे.
पुरुष फ्रीस्टाइल: अमन सेहरावत (57 किलो); यश (74 किलो), दीपक पुनिया (86 किलो), विकी (97 किलो) आणि सुमीत मलिक (125 किलो).
ग्रीको-रोमन: ज्ञानेंद्र (60 किलो), नीरज (67 किलो), विकास (77 किलो), सुनील कुमार (87 किलो), नरिंदर चीमा (97 किलो) आणि नवीन (130 किलो).
महिला : सोनम मलिक (62 किलो) आणि राधिका (68 किलो).
कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ: कुलदीप सिंग (संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक), विनोद कुमार, सुजीत, शशी भूषण प्रसाद, मनोज कुमार, वीरेंद्र सिंग आणि अलका तोमर (प्रशिक्षक); विशाल कुमार राय (फिजिओथेरपिस्ट) आणि नीरज (मालिश)
पंच: सत्य देव मलिक, दिनेश धोंडीबा गुंड आणि संजय कुमार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.