नवनियुत्त WFI रद्द, IOA च्या ऍड-हॉक कमिटीकडे सुत्र, 'हे' तीन सदस्य सांभाळणार जबाबदारी

IOA ad-hoc committee: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाज पाहाण्यासाठी ऍड-हॉक कमिटी स्थापन केली आहे.
PT Usha on Wrestlers Protest
PT Usha on Wrestlers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Olympic Association formed ad-hoc committee to look into matters of suspended Wrestling Federation of India:

भारतीय कुस्तीतील वाद गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) बुधवारी ऍड-हॉक कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाज पाहण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केले होते. त्यानंतर आयओसीने हे पाऊल उचलले आहे.

भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली कारवाई करण्याच्या मागणीवर काही भारतीय कुस्तीपटू ठाम आहे. ते गेल्या अनेक महिन्यांपासून कारवाईची मागणी करत असून त्यांनी आंदोलनही केले होते.

PT Usha on Wrestlers Protest
WFI Suspended: भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द! जागतिक संघटनेची कडक कारवाई

त्यानंतर ब्रिजभूषण यांना अध्यक्षपद सोडावे लागले. तसेच भारतीय कुस्ती संघटनेला नव्याने निवडणूक घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या निवडणूकीतही ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह बबलू यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

त्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने त्यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला, तर बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पंतप्रधान नरेंद्र मोदी निवासस्थानासमोर ठेवत निषेध केला. त्याचबरोबर विनेश फोगटनेही मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले.

याचदरम्यान, क्रीडा मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वी संजय सिंह यांची मान्यता रद्द करत नवीन कुस्ती संघटना निलंबित केली.

आता याच पार्श्वभूमीवर आयओएने ऍड-हॉक कमिटी स्थापन केली. या कमिटीचे नेतृत्व भारतीय वुशू असोसिएशनचे भुपेंद्र सिंह बाजवा करतील, तर ऑलिम्पियन एमएस सौम्या आणि माजी बॅडमिंटन खेळाडू मंजुशा कन्वर हे या कमिटीचे सदस्य असतील.

PT Usha on Wrestlers Protest
SA vs IND: 'तो संकटमोचक, जेव्हाही टीम इंडियाला...', KL राहुलच्या झुंजार फिफ्टीनंतर कोचकडून शाबासकी

याबद्दल आयओए अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले की 'आयओएला नुकतीच जाणीव झाली आहे की भारतीय कुस्ती संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि अधिकारी यांनी आपल्याच घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करून आणि आयओसीने स्वीकारलेल्या सुशासनाच्या तत्त्वांच्या विरोधात जाऊन स्वत:चे निर्णय घेतले आहेत. तसेच योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याने आयओएला ऍड-हॉक कमिटी स्थापन करावी लागली आहे.'

त्याचबरोबर पीटी उषा यांनी सांगितले की निष्पक्ष खेळ, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी, तसेच खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते. त्याचमुळे ऍड-हॉक कमिटीची स्थापना झाली आहे.

आता ऍड-हॉक कमिटी भारतीय कुस्ती संघटनेचे कामकाज तर पाहिलच, पण खेळाडूंची निवडही करेल. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंचे नाव पाठवण्याचे कामही पाहिल. त्याचबरोबर स्पर्धांच्या आयोजनाकडेही लक्ष देण्याबरोबरच संघटनेची वेबसाईट आणि बँक अकाऊंटही सांभाळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com