International table tennis player from Goa Wesley Do Rosario Dainik Gomantak
क्रीडा

FISU World University Games 2023 : गोव्याचा वेस्ली जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सहभागी

भारतीय संघाच्या निवड चाचणीत सफल

किशोर पेटकर

Men's Table Tennis : गोव्याचा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू वेस्ली दो रोझारियो (International table tennis player from Goa Wesley Do Rosario) चीनमधील चेंगडू येथे सुरू झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय विद्यापीठ पुरुष टेबल टेनिस संघ निवड चाचणीत त्याने शानदार कामगिरी नोंदवून पात्रता मिळविली होती.

जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भाग घेण्याची वेस्ली याची ही पहिलीच वेळ आहे. तो चंडीगडस्थित चित्कारा विद्यापीठात शिकत असून बीबीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे.

अखिल भारतीय विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत चित्कारा विद्यापीठाने उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना निवड चाचणीसाठी निमंत्रित करण्यात आले. वेस्लीने निवड चाचणी स्पर्धेत विजयी ठरत चीनमधील जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. या स्पर्धेत भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघात वेस्लीसह एस. दिव्यांश, हिम्नाकुल्हपुईनघेता, मुदित दाणी, जयनील मेहता हे खेळाडू आहेत.

यावर्षी मार्चमध्ये गोव्यात झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत वेस्ली भारतीय संघातून खेळला होता. या स्पर्धेसाठी त्याला वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Kartik Purnima: गोव्यात मंदिरांसमोरील दीपमाळची परंपरा कधी पासून?

Goa Land Policy: राज्यात भू-रुपांतर सुरुच! 32 भूखंडांच्या विभाग बदलास नगररविकास खात्याची मान्यता

Breaking: गुजरातमध्ये जहाजातून तब्बल ५०० किलो अमली पदार्थ जप्त, NCB- नौदलाची मोठी कारवाई

Goa Live Updates: सुखी, समाधानी, समृद्ध गोवेकर हेच आमचे ध्येय!

IFFI Film Premiere: इफ्‍फीत ‘हिसाब बराबर’ सिनेमाचा जागतिक प्रीमियर; इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार ‘अमर आज मरेगा’ चित्रपट

SCROLL FOR NEXT