Joshua Telles And Devesh Naik
Joshua Telles And Devesh NaikDainik Gomantak

Goa Senior Chess Tournament : लागोपाठ दोन महत्त्वपूर्ण विजय नोंदवत देवेश विजेतेपदाच्या दिशेने

मंदार सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे
Published on

Goa State Senior Chess Tournament : द्वितीय मानांकित देवेश नाईक याने राज्य सीनियर बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी लागोपाठ दोन महत्त्वपूर्ण विजय नोंदवून विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले. प्रमुख प्रतिस्पर्धी अव्वल मानांकित मंदार लाड याला सहाव्या फेरीत नमवून त्याने एका गुणाची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली.

देवेशने सलग सात विजय नोंदवून सात गुणांसह एकट्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मंदारवर मात केल्यानंतर देवेशने शनिवारी सातव्या फेरीत नऊ वर्षीय युवा खेळाडू जोशुआ तेलिस याला नमविले.

Joshua Telles And Devesh Naik
Colva Crime : ओडिशातून कामासाठी गोव्यात आला अन् दुसऱ्याच दिवशी संशयास्पद मृत्यू; गळ्यावर ब्लेडचे वार

मंदार सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याने सातव्या फेरीत आयुष शिरोडकर याला नमवून आव्हान कायम राखले. स्पर्धेतील बाकी दोन डाव रविवारी खेळले जातील. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली ही स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात सुरू आहे.

प्रत्येकी साडेपाच गुणांसह राजवीर पाटील व चैतन्य गावकर संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आयुष शिरोडकर, ऋषिकेश परब, आदर्श पटेकर, सिम्प्लिसियासो व्हिएगस, शुभ बोरकर, सरस पोवार यांच्या खाती प्रत्येकी पाच गुण आहेत.

सातव्या फेरीतील पहिले पाच निकाल

जोशुआ तेलिस पराभूत वि. देवेश नाईक, आयुष शिरोडकर पराभूत वि. मंदार लाड, जी. माधवन पराभूत वि. राजवीर पाटील, अनिकेत एक्का पराभूत वि. सरस पोवार, कविश घारसे पराभूत वि. चैतन्य गावकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com