IndvsPak T20 Astrologers prediction fail about Pakistan openers Dainik Gomantak
क्रीडा

IndvsPak T20: पाकिस्तानच्या सलामिविरांसमोर ज्योतीष्यांची भविष्यवाणी फेल

यंदाच्या ‘ट्वेन्टी-20’ विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारतीय संघाचा ‘फ्यूज’ उडाला

दैनिक गोमन्तक

दुबई: पाकिस्तानविरुद्ध 1992 च्या विश्वकरंडक स्पर्धेतून सुरू झालेली भारताची विजय परंपरा आखातात खंडित झाली. यंदाच्या ‘ट्वेन्टी-20’ (T20) विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या (IndvsPak) ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारतीय संघाचा ‘फ्यूज’ उडाला आणि तब्बल 10 विकेटच्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. कोणत्याही ICC विश्वचषक खेळामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानची (Ind vs Pak T20) लढत नेहमीच सर्व लढतींची जननी मानली जाते. मात्र यावेळी पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा दारून पराभाव केला आणि भारतीय क्रिकेटप्रेमिंचा हिरमोड झाला.

कमालीची उत्कंठा असलेल्या या सामन्यात भारतीय संघ ना फलंदाजीत ना गोलंदाजीत अपेक्षा पूर्ण करू शकला. भारताचे दोन्ही अनुभवी सलामीवीर सहा धावांत परतले; तर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी नाबाद 152 धावांची भागीदारी केली. दोन्ही संघांतील हा फरक सामन्याच्या निकालापर्यंत कायम राहिला. दरम्यान या सामन्याच्या आधी काही प्रसिद्ध ज्योतीषीनी भविष्यवाणीही केली होती. "दोन्ही संघ यावेळी मैदानात चांगली कामगिरी करुन दाखवायला तयार आणि तंदुरुस्त दिसत आहेत. आज होणाऱ्या लक्षवेधी सामन्यादरम्यान चाहत्यांना चढ-उताराच्या क्षणाची अनुभूती पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको." अशी भविष्यावाणी काल करण्यात आली होती.

विराट, पंतचाच लढा अनुभवात आणि तयारीत किती तरी पटीने पाकिस्तानपेक्षा सरस असलेला भारतीय संघ पूर्णतः निष्प्रभ ठरला. विराट कोहलीने कर्णधारपदास साजेशी 57 धावांची खेळी; तर एका हाताने दोन षटकार मारणाऱ्या रिषभ पंत याचा अपवाद वगळता सर्वच जणांनी निराशा केली. या वेळी भारत पाकिस्तानला हरवण्यात यशस्वी होईल का किंवा पाकिस्तान विजयी होइल का?, असे विचारले असता, पंडित जगन्नाथ म्हणाले होते “भारतीय संघ, विशेषतः कर्णधार विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या चेहऱ्यावरून सांगायचे झाले तर आम्ही असे म्हणू शकतो की या दोनपैकी कोणत्याही संघाला दुबईमध्ये यश मिळवणे सोपे आहे. मात्र कोहलीच्या चेहऱ्यावर एक दमदार नेतृत्वशैली दिसून येते आहे. तेव्हा त्याच्या संघाने कौतूकास्पद कामगिरी करणे अपेक्षित आहे. कोहलीच्या संघातील खेळाडू नुसतेच आत्मविश्वासू नाहीत तर चांगल्या तयारीनिशी मैदानात उतरले आहे."

तरीही 151 धावा लढा देण्यासाठी होत्या, पण भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात 10 धावा दिल्या तेथेच भारताच्या गोलंदाजीची हवा निघून गेली. त्यामुळे कोहलीने गोलंदाजीत सातत्याने बदल केले, तरीही 17.5 षटकांत ब्रेक थ्रू देणारा एकही चेंडू कोणाला टाकता आला नाही. या सामन्यात पाकिस्तानने प्रत्येक भारतीयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे केलेल्या डावपेचांची तेवढीच सक्षमपणे अंमलबजावणीही केली. याउलट भारतीय खेळाडू पूर्व अनुभवाच्या शिदोरीवरच मैदानात उतरलेले त्यांच्या खेळातून दिसून येत होते.

"मैदानावर कोहलीची उपस्थिती संपूर्ण टीमला बळ देईल. तसेच, कोहलीच्या कुंडलीत सूर्य आणि शनी बलवान असल्याने तो आपल्या भारतीय संघाला विजयाकडे नेण्यात यशस्वी होईल. जिथे पाकिस्तानचा विचार केला तर भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार नाही,” असे जेष्ठ ज्योतीषी जगन्नाथ यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT