कोणत्याही ICC विश्वचषक खेळामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानची (Ind vs Pak T20) लढत नेहमीच सर्व लढतींची जननी मानली जाते. यावेळी, 24 ऑक्टोबर म्हणजे आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चुरशीच्या लढतीसाठी मैदान तयार करण्यात आले. या दोन्ही संघातील हाय होल्टेज सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ICCT20 विश्वचषकादरम्यान बघायला मिळेल.
भारताचा विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अजिंक्य विक्रम असताना, आजपण विराट कोहली आणि त्याचा संघ चांगली कामगिरी दाखवू शकतील का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमिंना पडला असावा. तेव्हा यावर प्रसिद्ध ज्योतिषींनी उत्तर दिले आहे. लोकप्रिय ज्योतिषी आणि चेहरा बघून भविष्यवाणी करणारे पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी आज होणार्या सामन्याबाबत एक भविष्यवाणी केली आहे. ज्यांनी यापूर्वीही अनेक क्रिकेट सामन्यांबद्दल तसेच क्रिकेट क्षेत्रात असेलल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल अनेक योग्य भविष्यवाणी केल्या आहेत.
ज्योतिषाच्या मते, "दोन्ही संघ यावेळी मैदानात चांगली कामगिरी करुन दाखवायला तयार आणि तंदुरुस्त दिसत आहेत. आज होणाऱ्या लक्षवेधी सामन्यादरम्यान चाहत्यांना चढ-उताराच्या क्षणाची अनुभूती पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको." या वेळी भारत पाकिस्तानला हरवण्यात यशस्वी होईल का किंवा पाकिस्तान विजयी होइल का?, असे विचारले असता, पंडित जगन्नाथ म्हणाले, “भारतीय संघ, विशेषतः कर्णधार विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या चेहऱ्यावरून सांगायचे झाले तर आम्ही असे म्हणू शकतो की या दोनपैकी कोणत्याही संघाला दुबईमध्ये यश मिळवणे सोपे आहे. मात्र कोहलीच्या चेहऱ्यावर एक दमदार नेतृत्वशैली दिसून येते आहे. तेव्हा त्याच्या संघाने कौतूकास्पद कामगिरी करणे अपेक्षित आहे. कोहलीच्या संघातील खेळाडू नुसतेच आत्मविश्वासू नाहीत तर चांगल्या तयारीनिशी मैदानात उतरले आहे. मैदानावर कोहलीची उपस्थिती संपूर्ण टीमला बळ देईल. तसेच, कोहलीच्या कुंडलीत सूर्य आणि शनी बलवान असल्याने तो आपल्या संघाला विजयाकडे नेण्यात यशस्वी होईल. जिथे पाकिस्तानचा विचार केला तर भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार नाही यात कोणतीही शंका नाही.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.