Virat Kohli and Suryakumar Yadav
Virat Kohli and Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

ICC Men's T20I Team मध्ये टीम इंडियाचा बोलबाला, विराट-सूर्यासह तीन क्रिकेटर्सला संधी

Pranali Kodre

ICC Men's T20I Team: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी 2022 वर्षातील सर्वोत्तम टी20 संघाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या सर्वोत्तम टी20 संघात 2022 वर्षांत चांगली कामगिरी करणाऱ्या विविध राष्ट्रीय संघातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात सर्वाधिक भारताच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना आयसीसी 2022 टी20 संघात स्थान मिळाले आहे. तसेच या संघाचे नेतृत्व 2022 टी20 वर्ल्डकप विजेता कर्णधार जोस बटलकरकडे सोपवण्यात आले आहे.

आयसीसीच्या 2022 टी20 संघात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या जोस बटलरबरोबरच सॅम करन या संघात आहे, तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना संधी मिळाली आहे.

तसेच न्यूझीलंड, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील प्रत्येकी एका खेळाडूला आयसीसी 2022 टी20 संघात जागा मिळाली आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स, आयर्लंडचा जोश लिटिल, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा यांना या संघात संधी मिळाली आहे.

(ICC Men's T20I Team of the Year 2022 announced )

अशी राहिली तिन्ही भारतीय खेळाडूंची टी20 कामगिरी

आयसीसीच्या 2022 टी20 संघात जागा मिळालेल्या विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी राहिली आहे. विराटने गेल्या वर्षात 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 55.78 च्या सरासरीने 781 धावा केल्या होत्या.

त्याने त्याचा 2 वर्षांचा शतकाचा दुष्काळही 2022 मध्ये संपवला. त्याने गेल्यावर्षात पहिले आंतरराष्ट्रीय टी20 शतक केले होते. तसेच तो आशिया चषक 2022 स्पर्धेतही चांगल्या लयीत होता. त्याने या स्पर्धेत 5 सामन्यांत 276 धावा केलेल्या.

तसेच सूर्यकुमारने 2022 वर्ष त्याच्या टी20 क्रिकेटमधील कामगिरीने गाजवले. तो गेल्यावर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 2022 वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 2 शतकासह 1164 धावा केलेल्या.

तो एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडणारा मोहम्मद रिझवान नंतरचा दुसराच फलंदाज आहे. रिझवानने 2021 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1326 धावा केलेल्या.

हार्दिकबद्दल सांगायचे झाल्यास त्याने भारतासाठी 2022 वर्षात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात योगदान दिले. त्याने या वर्षात 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 607 धावा केल्या आणि 20 विकेट्स घेतल्या.

आयसीसी टी20 संघ 2022: जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक)(इंग्लंड), मोहम्मद रिझवान (पाकिस्तान), विराट कोहली (भारत), सूर्यकुमार यादव (भारत), ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), हार्दिक पंड्या (भारत), सॅम करन (इंग्लंड), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), हॅरिस रौफ (पाकिस्तान), जोश लिटिल (आयर्लंड).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT