IND vs AUS: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात घबराटीचे वातावरण पसरले आहे. टीम इंडियाचा डॅशिंग टेस्ट बॅट्समन चेतेश्वर पुजाराने असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम हैराण झाली आहे. ऑस्ट्रेलियाला 9 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराने आपला धडाकेबाज फॉर्म दाखवत मोठा विक्रम केला आहे.
टीम इंडियाचा (Team India) खतरनाक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने भारतात 12,000 प्रथम श्रेणी धावा पूर्ण करुन इतिहास रचला आहे. चेतेश्वर पुजाराने भारतात 12,000 प्रथम श्रेणी धावा करत एक मोठा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. आजपर्यंत सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाजही हा पराक्रम करु शकलेले नाहीत.
चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) आधी वासिफ जाफरने हा पराक्रम केला आहे. वासिफ जाफरने भारतात 14609 प्रथम श्रेणी धावा नोंदवल्या आहेत. आंध्र प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने हा विक्रम केला. या सामन्यात शानदार फलंदाजी करताना पुजाराने 91 धावा केल्या.
तसेच, चेतेश्वर पुजाराने 240 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56 शतके आणि 73 अर्धशतकांसह 18422 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे.
दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा 9 फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन संघाचा नाश करेल. पुजाराने भारतासाठी 98 कसोटी सामने खेळले असून 44.39 च्या सरासरीने 7014 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 19 शतके आणि 34 अर्धशतके आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाला
चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.