Sandesh Jhingan Dainik Gomantak
क्रीडा

क्रोएशियातील क्लबकडून संदेश झिंगन करारबद्ध

आगामी देशांतर्गत फुटबॉल (Football) मोसमात तो कोलकात्याच्या एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) संघाकडून खेळणार नाही.

किशोर पेटकर

पणजी: भारताचा अनुभवी फुटबॉलपटू संदेश झिंगन (Sandesh Jhingan) याला क्रोएशियातील अव्वल साखळी स्पर्धेत खेळणाऱ्या एचएनके सिबेनिक संघाने करारबद्ध केले आहे, त्यामुळे आगामी देशांतर्गत फुटबॉल मोसमात तो कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाकडून खेळणार नाही.

क्रोएशियातील क्लबकडून व्यावसायिक करार मिळालेला 28 वर्षीय झिंगन भारताचा पहिला फुटबॉलपटू आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गतमहिन्यात बचावपटू झिंगनची 2020-21 मोसमातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड केली होती.

चंडीगडमधील सेंट स्टीफन्स फुटबॉल अकादमीतर्फे (St. Stephen's Football Academy) युवा कारकिर्दीस सुरवात केलेल्या झिंगनने 2011 साली युनायटेड सिक्कीम संघातर्फे देशातील सीनियर फुटबॉलमध्ये पदार्पण केले. 2014 साली वयाच्या 21व्या वर्षी तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. 2015 साली त्याने फिफा विश्वकरंडक (2018) स्पर्धेच्या पात्रता फेरीत नेपाळविरुद्धच्या लढतीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आयएसएल स्पर्धेत झिंगन सहा वर्षे खेळला. या कालावधीत केरळा ब्लास्टर्सने दोन वेळा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. 2020 मध्ये त्याने एटीके मोहन बागानशी करार केला, पण दुखापतीमुळे तो मोसमात मुकला.

‘‘मला वाटतं, मी कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जेथे मी स्वतःची शक्य तितक्या उच्च स्तराव चाचणी करण्यास इच्छुक आहे आणि हे एकदम परिपूर्ण व्यासपीठ आहे. युरोपमध्ये खेळण्याची माझी मनीषा होती आणि आता मी हे आव्हान स्वीकारले आहे,’’ असे झिंगन याने नमूद केले. संधी दिल्याबद्दल त्याने एचएनके सिबेनिक संघाचे मुख्य प्रशिक्षक मारियो रोझास, संघाचे मालक व व्यवस्थापक यांचे आभार मानले असून मैदानावर संधीचे सोने करताना शंभर टक्के योगदान देण्याचे ध्येय बाळगले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT