India's Prime Minister and President Congratulate U19 Team India | U19 Women's T20 World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

U19 India Women: पंतप्रधान अन् राष्ट्रपतींकडूनही U19 WC विजेत्या टीम इंडियाचं कौतुक, पाहा ट्वीट्स

भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकल्याबद्दल त्यांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडूनही कौतुक करण्यात आले.

Pranali Kodre

U19 Women's T20I World Cup 2023: 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने रविवारी 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले. पॉचेफस्ट्रूम येथे रविवारी झालेल्या या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव केला.

भारताने या विजयासह पहिलाच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. तसेच भारतीय महिला क्रिकेटमधील देखील हे पहिलेच आयसीसी विजेतेपद ठरले. त्यामुळे सध्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले.

तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील शफली वर्मा कर्णधार असलेल्या 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन करताना 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

याशिवाय भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही विश्वविजेत्या भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले.

दौपदी मुर्मू यांच्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे की 'पहिला 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. या प्रतिभाशाली युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. हे चॅम्पियन्स आपल्या युवा पिढीसाठी विशेषतः मुलींसाठी प्रेरणा आहेत. या ऐतिहासिक विजयाचा भारताला अभिमान आहे.'

तसेच मोदी यांनी ट्वीट केले की 'आयसीसीचा 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. त्यांनी शानदार क्रिकेट खेळले आणि त्यांचे यश क्रिकेटपटूंच्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.'

(India's Prime Minister and President Congratulate U19 Team India for Winning U19 Women's T20 World Cup 2023)

दरम्यान, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी इंग्लंडने 69 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने केवळ 14 धावात पूर्ण केला आणि वर्ल्डकपवर नाव कोरले.

भारताकडून 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. त्यामुळे भारतासाठी विजयाचा मार्ग सोपा झाला. त्रिशा विजयासाठी 3 धावांची गरज असताना बाद झाली होती. मात्र, सौम्याने विजयी धाव काढत भारताचा विजय निश्चित केला.

तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करू दिला नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ 17.1 षटकात 68 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT