Team India  Twitter/@BCCI
क्रीडा

ENG Vs IND: पराभवानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का

headingley कसोटी हरल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आणि चाहते निराश झाले असताना इंग्लंडमधून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अजून एक वाईट बातमी आली समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत (ENG Vs ING) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने पुनरागमन केले. तसेच, भारताने चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात उर्वरित आठ विकेट घेतल्याने यजमान इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला. मालिका 1-1 अशा बरोबरीने संपली. मात्र, या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला.

हेडिंग्ले कसोटी हरल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आणि चाहते निराश झाले असताना इंग्लंडमधून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अजून एक वाईट बातमी आली समोर आली आहे. भारताचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) सामन्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जडेजाने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. या फोटोमध्ये जडेजाने रुग्णालयातील दिलेले कपडे परिधान केल्याचे दिसत आहे.

Ravindra Jadeja

रवींद्र जडेजा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जखमी झाला असल्याचे समजते आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर काही काळ तो मैदानाबाहेर राहीला. जडेजाने लीड्स कसोटीत आपली अष्टपैलू कामगिरी केली होती. गोलंदाजी करताना जडेजाने हसीब हमीद आणि मोईन अलीच्या विकेट्स घेतल्या. फलंदाजी करताना भारताने दुसऱ्या डावात पाच चौकार आणि एका षटकाराच्या मारत 30 धावा घेतल्या होत्या.

2 सप्टेंबरपासून जडेजा ओव्हलवर मालिकेच्या चौथ्या कसोटीत खेळला नाही तर भारतीय संघाला हा मोठे नुकसान होऊ शकते. कारण या मैदानावरील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात जडेजासह अनुभवी रविचंद्रन अश्विनला मैदानात उतरवू शकते. त्यामूळे जडेजाच्या प्रकृतीविषयीच्या बातमीबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT