ENG vs IND: ओव्हलमध्ये भारताची परीक्षा, मैदान भारतासाठी 'अनलकी'

2018 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमने 118 धावांनी येथे कसोटी सामना गमावला होता. आता ओव्हल कसोटी सामन्यात कोहलीच्या सैन्याने हा इतिहास (History) बदलणार का, हे पाहण्यासारखे असेल.
टीम इंडियाला (Team India) गेल्या 50 वर्षात येथे कधीही विजय (Victory) मिळवला आलेला नाही.
टीम इंडियाला (Team India) गेल्या 50 वर्षात येथे कधीही विजय (Victory) मिळवला आलेला नाही. Dainik Gomantak

ENG vs IND: तिसऱ्या कसोटीत भारताला (India) पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आता विराट कोहलीसाठी (Virat Kohli) ओव्हलमध्ये (Oval) कठीण आव्हान असणार आहे. टीम इंडियाला (Team India) गेल्या 50 वर्षात येथे कधीही विजय (Victory) मिळवला आलेला नाही. पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम-ट्रेंट ब्रिज येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्याचवेळी दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला, ज्याला क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. टीम इंडियाने या सामन्यात चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. लीड्स (हेडिंग्ले) मधील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने (England) संघाने जबरदस्त कमबॅक करत, टीम इंडियाला चोख प्रत्युत्तर दिले आणि सामना एक डाव आणि 76 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. चौथा कसोटी सामना लंडनमध्ये (ओव्हल) खेळला जाणार आहे.

टीम इंडियाला (Team India) गेल्या 50 वर्षात येथे कधीही विजय (Victory) मिळवला आलेला नाही.
Eng Vs Ind: तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव

ओव्हलमधील भारताचा विक्रम

टीम इंडियाने ओव्हलवर आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. या 13 सामन्यांमध्ये भारतीय संघाने फक्त एक सामना जिंकला आहे. त्याचबरोबर 7 सामने अनिर्णित राहिले असून संघाला पाच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये भारताने या मैदानावर सामना जिंकला. 2018 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीच्या टीमने 118 धावांनी येथे कसोटी सामना गमावला होता. आता ओव्हल कसोटी सामन्यात कोहलीच्या सैन्याने हा इतिहास (History) बदलणार का, हे पाहण्यासारखे असेल.

टीम इंडियाला (Team India) गेल्या 50 वर्षात येथे कधीही विजय (Victory) मिळवला आलेला नाही.
ENG vs IND: विराट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांची पुन्हा हुल्लडबाजी

मधल्या फळीची सर्वात मोठी समस्या

या मालिकेतील कोहलीच्या संघासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे संघाच्या मधल्या फळीतील खेळाडूंचा खराब फॉर्म हा एक डोकेदुखीचा विषय आहे. भारताच्या या कमकुवतपणावर इंग्लंड पुन्हा एकदा ओव्हल मैदानावर हल्ला करणार हे नक्की आहे. हेडिंग्ले कसोटी दरम्यान टीम इंडियाचा पहिल्या डावात 78 धावांवर गारद झाला. त्याचबरोबर रोहित आणि पुजारा यांनी दुसऱ्या डावात थोडा संघर्ष केला. पण पुन्हा एकदा संघाची मधली फळी काही विशेष करू शकली नाही. मात्र, खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतके झळकावून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com