CV Bhavani Devi Dainik Gomantak
क्रीडा

Bhavani Devi Fencing: भवानी देवीनं चीनमध्ये रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच भारतीय तलवारबाज

भारताची तलवारबाज भवानी देवीने सोमवारी भारतासाठी ऐतिहासिक कामिगिरी केली.

Pranali Kodre

CV Bhavani Devi won India's 1st Bronze Medal at Asian Fencing Championships: भारताची ऑलिम्पियन तलवारबाज सीए भवानी देवीने सोमवारी चीनमधील वुक्सी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक आहे.

तिला उपांत्य सामन्यात सोमवारी पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे तिची अंतिम सामन्यात जाण्याची संधी हुकली. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात भवानी देवीला उझबेकिस्तानच्या जेनाब डेयिबेकोवाविरुद्ध 14-15 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पण तिने ज्यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, त्याचवेळी पदक निश्चित करत इतिहालासाला गवसणी घातली होती. फक्त ती कोणते पदक जिंकणार, याची प्रतिक्षा होती.

भवानी देवीने उपांत्यपूर्व फेरीत सध्याची वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी एमुरा हिला १५-१० अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. जपानच्या मिसाकीविरुद्ध हा तिचा पहिला विजय देखील होता. यापूर्वी तिने मिसाकीविरुद्धच्या सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता.

भवानी देवीने त्याआधी या स्पर्धेत राउंड ऑफ 64 मध्ये कझाकस्तानच्या डोस्पे करीनाला पराभूत केले होते, तर उपउपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित ओजाकी सेरीला पराभूत केले होते.

दरम्यान, भारतीय तलवारबाजी संघाचे महासचिव राजीव मेहता यांनीही तिच्या ऐतिहासिक यशाचे कौतुक करताना म्हटले की हा सन्मानाचा दिवस आहे. तसेच त्यांनी आशा केली आहे की ती लवकरत सुवर्णपदकही जिंकेल.

तसेच भारताचे केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही ट्वीट करत तिचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की 'भवानीचा शानदार पराक्रम. भवानी देवीने वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकत इतिहास रचला.' तसेच त्यांनी तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाचेही कौतुक केले आहे.

भवानी देवीने यापूर्वी ऑलिम्पिकमध्येही सहभागी होत इतिहास रचला होता. ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिली तलवारबाज आहे. तिने टोकिटो ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. पण तिला या स्पर्धेत राऊंड ऑफ 32 मधून बाहेर जावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT