Harleen Deol - MS Dhoni Instagram
क्रीडा

MS Dhoni: 'भारतात थंडी, पण ही माझी कॅप्टनकूल मुमेंट', धोनीला भेटून हरलीन देओलचा आनंद गगनात मावेना

Harleen Deol: भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू हरलीन देओलने धोनीबरोबरचा तिचा फॅन मुमेंट शेअर केला आहे.

Pranali Kodre

Indian Woman Cricketer Harleen Deol met Captain Cool MS Dhoni in Ranchi:

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची क्रेज केवळ चाहत्यांमध्येच नाही, तर सेलिब्रेटिंमध्येही आहे. अनेक क्रिकेटपटूही त्याचे चाहते आहेत. नुकतेच भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू हरलीन देओलने धोनीबरोबरचा तिचा फॅन मुमेंट शेअर केला आहे.

धोनीने त्याच्या कारकिर्दीत खेळाडू, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे त्याला आदर्श मानणारे अनेक युवा क्रिकेटपटू आहेत. 2020 मध्ये हरलीननेही ती धोनीची चाहती असल्याचे आणि त्याला आदर्श मान असल्याचे सांगितले आहे.

आता तिला धोनीला भेटण्याचीही संधी मिळाली आहे. अष्टपैलू हरलीन धोनीला त्याच्या शहरात म्हणजे रांचीमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनच स्टेडियमवर भेटली. त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने यात म्हटले आहे की धोनीला भेटणे हा अविश्वसनीय क्षण होता.

तिने धोनीबरोबरचे फोटो शेअर केले असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'हा क्षण अविश्वसनीय वाटला. माझ्या आदर्श व्यक्तीबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. सध्या भारतात आधीच थंडी आहे, पण ही माझ्यासाठी कॅप्टनकूल मुमेंट आहे.'

'मी खेळाडू म्हणून तुला आदर्श मानत होते, पण तुला भेटल्यानंतर एक माणूस म्हणूनही तुझा आदर्श ठेवेल. मला अजूनही विश्वास बसत नाहीये, की मी तुला भेटले.'

हरलीनची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

दरम्यान, हरलीन नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत खेळली. तिला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. पण तिला फार काही करता आले नाही. ती १ धाव करून बाद झाली. आता ती फेब्रुवारीमध्ये सुरु होणाऱ्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत खेळताना दिसेल. ती या स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाचा भाग आहे.

धोनी खेळणार आयपीएल 2024

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली, तरी त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. तो आता आयपीएलच्या 17 व्या हंगामातही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. तथापि तो या हंगामात नेतृत्व करणार की दुसऱ्या खेळाडूकडे ही जबाबदारी सोपवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

SCROLL FOR NEXT