MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या जवळच्या मित्राने केली फसवणूक, रांचीमध्ये गुन्हा दाखल; 15 कोटींचे नुकसान

MS Dhoni: म‍िह‍िर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र आणि त्याचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहीरने धोनीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विशवॉश यांच्याविरुद्ध रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. म‍िह‍िर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र आणि त्याचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहीरने धोनीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिहिरने महेंद्रसिंग धोनीसोबत 2017 मध्ये जगभरात क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी करार केला होता. मात्र दिवाकरने करारनाम्यातील नमूद केलेल्या अटी पाळल्या नाहीत. या प्रकरणात अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी भरावी लागली. करारानुसार, नफा वाटून घ्यायचा होता, परंतु करारातील सर्व अटी आणि शर्ती झुगारल्या गेल्या.

धोनीला 15 कोटींचे नुकसान झाले

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सचे अथॉर‍िटी लेटर मागे घेतले. धोनीने त्याला अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला की, अर्का स्पोर्ट्सने त्याची फसवणूक केली आहे, ज्यामुळे धोनीचे 15 कोटींचे नुकसान झाले आहे.

MS Dhoni
MS Dhoni: 'धोनीच्या उत्तराधिकाऱ्यासाठी गेले 10 वर्षे आम्ही...' कोच फ्लेमिंग यांचे मोठे भाष्य

ऋषभ पंतचीही 1.63 कोटी रुपयांची फसवणूक झाली

अलीकडेच ऋषभ पंतची लाखो-कोटींची फसवणूक झाली. हे काम मृणांक सिंह नावाच्या व्यक्तीने केली होती. 25 डिसेंबर रोजी पोलिसांनी त्याला पकडले होते. हरियाणातील फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या आरोपी मृणांकने अंडर-19 स्टेजवर राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते, असा दावा केला जात आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावाही त्याने केला होता.

मृणांकने 2020-2021 मध्ये ऋषभ पंतसोबत 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणांकने पंतला स्वस्तात लग्झरी घड्याळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यामुळे ऋषभ पंतच्या मॅनेजरनेही तक्रार दाखल केली होती. पंतची फसवणूक करण्यापूर्वी, मृणांकने स्वत:ची ओळख लक्झरी घड्याळे, बॅग्ज आणि दागिन्यांचा व्यापारी अशी केली होती, जो लक्झरी वस्तू स्वस्त दरात विकतो. ऋषभचा विश्वास जिंकण्यासाठी तो अनेकदा खोटं बोलला आणि त्याने या वस्तू इतर क्रिकेटपटूंनाही सवलतीच्या दरात विकल्याचं सांगितलं.

MS Dhoni
MS Dhoni: धोनीच्या 2019 वर्ल्डकपमधील रनआऊटनंतर काय झालं? चार वर्षांनंतर गप्टीलचं मोठं भाष्य

आता धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे

कॅप्टन कूल धोनीच्या नावावर 3 ICC ट्रॉफी आहेत (2007 T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी), असे करणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नावावर 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड आहे, रोहित शर्माने देखील मुंबईसाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 250 IPL सामन्यात 5082 धावा केल्या आहेत. यात 142 झेल आणि 42 यष्टींचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com