Shoaib Malik-Sania Mirza Dainik Gomantak
क्रीडा

Sania Mirza-Shoaib Malik Rift: 12 वर्षात तुटले नाते, अखेर घटस्फोट होणार!

Sania Mirza News: सानिया मिर्झाच्या लग्नाच्या वेळी जगभर जितक्या चर्चा झाल्या, तितक्याच चर्चा आता तिच्या घटस्फोटाच्याही होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Sania Mirza News: सानिया मिर्झाच्या लग्नाच्या वेळी जगभर जितक्या चर्चा झाल्या, तितक्याच चर्चा आता तिच्या घटस्फोटाच्याही होत आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा याविषयी अद्याप काहीही बोलले नसले तरी, दोघेही मनापासून वेगळे झाले आहेत. आता लवकरच हे जोडपे कायदेशीर मार्गानेही वेगळे होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, असे म्हणणारे देखील सांगत आहेत की, त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे, ज्याची घोषणा देखील लवकरच केली जाईल.

विवाद माहीत नाही

दोघांमधील हे नाते संपवण्याचा हेतू कोणाचा आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण बातमी अशी आहे की, शोएबने सानियाची फसवणूक केली होती, हे आता सानियाला समजले आहे. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे. अलीकडेच, सानियाने इंस्टाग्रामवर (Instagram) असे काहीतरी पोस्ट केले, ज्यामुळे ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्यांशी झुंज देत असल्याचा अंदाज लावला जात होता.

दुसरीकडे, तिच्या इंस्टाग्रामवर पाहताना, सानियाच्या ताज्या पोस्टमध्ये शोएब कुठेही दिसत नाही, तर ती अनेकदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्यांच्यात आलेले अंतर कमी केले. इतकंच नाही तर गेल्या 3 दिवसांपासून सानिया आणि शोएब वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र दोघांनीही यावर कोणतेही भाष्य केले नाही आणि या वृत्तांचे खंडनही केलेले नाही.

नातं 12 वर्षांनी संपणार

12 एप्रिल 2010 रोजी सानिया आणि शोएबचे लग्न झाले. भारतात (India) लग्न झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) लग्नाचे रिसेप्शन पार पडले होते. दोघांमध्ये अप्रतिम बाँडिंग पाहायला मिळत होते, मात्र आता अचानक घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या लग्नाला फक्त 12 वर्षे झाली आहेत. मात्र आता हे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT