Hugo Bumus Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super league: बुमूस सर्वाधिक महागडा

इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक रक्कम दिली आहे.

किशोर पेटकर

पणजी: कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाने (ATK Mohan Bagan Team) आक्रमक मध्यरक्षक ह्यूगो बुमूस (Hugo Bumus) याला मुंबई सिटीकडून घेताना इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक रक्कम दिली आहे. या फ्रेंच-मोरोक्कन फुटबॉलसाठी सुमारे दोन कोटी रुपये ट्रान्सफर फी मोजण्यात आल्याचे वृत्त आहे.

एटीके मोहन बागानतर्फे अजून बुमूसची करार रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. 2020-21 मोसमाच्या प्रारंभी स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांनी मुंबई सिटीचे प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यानंतर 25 वर्षीय बुमूसला एफसी गोवाकडून मुंबईतील संघात घेताना अंदाजे 1.5 कोटी रुपयांचा करार झाल्याची तेव्हा माहिती होती.. त्यावेळचा करार रक्कम विक्रम आता एटीके मोहन बागानने मोडला आहे.

बुमूस आयएसएल स्पर्धेतील चार मोसमात 58 सामने खेळला असून त्याने 19 गोल व 24 असिस्ट अशी कामगिरी केली आहे. एफसी गोवातर्फे खेळताना 2019-20 मोसमात तो आयएसएल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

स्पॅनिश अंतोनियो लोपेझ हबास (Lopez Habas) यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागान संघाने आगामी मोसमासाठी मजबूत संघ बांधणीवर भर दिला आहे. या संघाने गोमंतकीय आघाडीपटू लिस्टन कुलासो याला हैदराबाद एफसीकडून करारबद्ध केले आहे. त्यासाठी आयएसएलमधील गतउपविजेत्या संघाने एक कोटी रुपये ट्रान्सफर शुल्क मोजल्याची माहिती आहे. आयएसएलच्या इतिहासात लिस्टन महागडा भारतीय फुटबॉलपटू मानला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT