Indian Super League: चेन्नईयीन एफसीच्या बचावफळीत नवा चेहरा

चेन्नईयीन एफसीच्या (Chennaiyin FC) बचावफळीत सलाम रंजन सिंग (Salaam Ranjan Singh) हा नवा चेहरा दाखल झाला आहे.
Salaam Ranjan Singh
Salaam Ranjan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चेन्नईयीन एफसीच्या (Chennaiyin FC) बचावफळीत सलाम रंजन सिंग (Salaam Ranjan Singh) हा नवा चेहरा दाखल झाला आहे. मणिपूरच्या 25 वर्षीय सेंटर बॅक खेळाडूशी दोन वेळच्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल विजेत्या संघाने शुक्रवारी करार केला.

पुणे एफसी अकादमीत प्रशिक्षण (Pune FC Academy) पूर्ण केल्यानंतर 2013-14 मोसमात त्यांच्या सीनियर संघातून सलामने आय-लीग स्पर्धेत पदार्पण केले. पुणे एफसीतर्फे तो एएफसी कप स्पर्धेतही खेळला. नंतर तो बंगळूर एफसी संघात दाखल झाला, या संघातर्फे त्याने आय-लीग व फेडरेशन कप विजेतेपद पटकाविले. सहा फूट एक इंच अशी भरपूर उंची लाभलेल्या सलाम रंजनने नंतर आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडचे (Northeast United) तर आय-लीग स्पर्धेत ईस्ट बंगालचे (East Bengal) प्रतिनिधित्व केले. आय-लीग स्पर्धेत तो पन्नासपेक्षा जास्त सामने खेळला आहे.

Salaam Ranjan Singh
स्क्वेय आर्टिस्टिक राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक

सलाम रंजनने 2017 साली भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2018 मधील इंटरकाँटिनेंटल कप आणि 2019 मधील आशिया करंडक स्पर्धेत खेळलेला हा बचावपटू भारतातर्फे आतापर्यंत 11 सामने खेळला आहे. 2019-20 मोसमात तो एटीके संघात परतला, त्या मोसमात एटीके संघ आयएसएल विजेता ठरला होता. मैदानावर अधिकाधिक वेळ खेळण्याची संधी मिळवत चेन्नईयीन क्लबच्या (Chennaiyin Club) लक्ष्यप्राप्तीस मदत करण्याचे ध्येय सलाम रंजनने बाळगले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com