Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: रोहितच मायदेशात 'हिटमॅन'! कसोटीतील 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये आता केवळ ब्रॅडमन पुढे

नागपूर कसोटीत खेळताना रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली असून, या विक्रमाच्या यादीत त्याच्या पुढे केवळ डॉन ब्रॅडमन आहेत.

Pranali Kodre

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारताचा कर्णधार रोहित शर्मा 56 धावांवर नाबाद आहे. या दरम्यान त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर संपल्यानंतर भारतीय संघ पहिल्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आहे. दरम्यान, रोहितने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार मारले होते. त्याच्या या खेळामुळे त्याने पहिल्याच दिवशी अर्धशतकही पूर्ण केले.

त्यामुळे तो आता कमीत कमी 30 कसोटी डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये मायदेशात कसोटीत सर्वाधिक फलंदाजी सरासरी असलेला तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरपर्यंत मायदेशात 75.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

मायदेशात कसोटीत सर्वाधिक फलंदाजी सरासरी असलेल्या (कमीत कमी 30 डाव) फलंदाजांमध्ये रोहितच्या वर केवळ डॉन ब्राॅडमन आहेत. ब्रॅडमन यांनी त्यांच्या मायदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये 98.22 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या यादीत ब्रॅडमन आणि रोहितनंतर मार्नस लॅब्युशेन आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये 70.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

रोहितने मायदेशात कसोटीत आत्तापर्यंत 21 सामन्यामधील 31 डावात 75.66 च्या सरासरीने 1816 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

नागपूर कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांतच आटोपला.

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सलामीला 76 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी दिवसाच्या अखेरीस टॉड मर्फीने केएल राहुलला 20 धावांवर बाद करत मोडली. पहिल्या दिवसाखेर भारताने 24 षटकात 1 बाद 77 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित 56 धावांवर आणि अश्विन शुन्यावर नाबाद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT