IPL Captains
IPL Captains Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पहिला टप्पा संपला! 35 सामन्यांनंतर कोणती टीम कोणत्या क्रमांकावर, घ्या जाणून

Pranali Kodre

IPL 2023 First Half Complete: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामातील 35 वा सामना मंगळवारी (25 एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 55 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्याबरोबर आयपीएल 2023 हंगामातील साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला.

आता सर्व 10 संघांचे प्रत्येकी 7 सामने खेळून झाले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्यातील 7 सामने बाकी आहेत. पहिल्या टप्प्यानंतर सध्या दोन संघांचे 10 गुण आहेत, चार संघांचे 8 गुण, एका संघाचे 6 गुण आणि तीन संघांचे 4 गुण आहेत.

सध्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स प्रत्येकी 5 विजयांसह 10 गुण मिळवत पहिल्या दोन क्रमांकावर आहे. तसेच त्यामागे राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स या संघांचे प्रत्येकी 4 विजयांसह 8 गुण आहेत. पण नेट रन रेटच्या फरकामुळे हे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

मुंबई इंडियन्स 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर असून त्यांनी 3 सामने जिंकले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी 2 विजयांसह 4 गुण आहेत.

दरम्यान, सर्व 70 साखळी सामने पार पडल्यानंतर पहिल्या चार क्रमांकावर राहाणारे संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे अद्याप सर्व 10 संघांचे आव्हान कायम आहे. पण आता यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निकालांनंतर प्लेऑफसाठीची अनेक समीकरणे बदलताना दिसणार आहेत.

पण सध्याच्या गुणतालिकेनुसार चेन्नई आणि गुजरात सध्या भक्कम स्थितीत असून त्यांनी जर दुसऱ्या टप्प्यातही त्यांची लय कायम ठेवल्यास ते सहज प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतील. त्याचबरोबर राजस्थान, लखनऊ, रॉयल आणि पंजाब संघांनाही प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चांगली संधी आहे.

पण मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात आपली कामगिरी सुधारत दमदार खेळ करून दाखवावा लागणार आहे. त्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील पराभव महागात पडू शकतात.

मे महिन्याच्या अखेरीस प्ले-ऑफ

दरम्यान, आयपीएल 2023 साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला असला, तरी आता दुसरा टप्पा 26 एप्रिलपासून सुरू होईल. साखळी फेरीतील सर्व 70 सामने 21 मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने 23 ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत.

प्लेऑफमध्ये 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना, 24 मे रोजी एलिमिनेटर आणि 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर चेन्नईमध्ये होणार आहे. तसेच दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादला खेळवला जाईल.

ऑरेंज आणि पर्पल कॅपचे दावेदार

सध्या पहिल्या टप्प्यानंतर आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 67.50 च्या सरासरीने 405 धावा केल्या आहेत.

तसेच दुसऱ्या क्रमांरावर चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर डेवॉन कॉनवे आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 314 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 306 धावांसह दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. या तिघांनीच आत्तापर्यंत या हंगामात 300 धावांचा टप्पा पार केला आहे.

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा गोलंदाज राशीद खान असून त्याने 7 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग आहे. या दोघांनीही प्रत्येकी 7 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि चेन्नई सुपर किंग्सचा वेगवाग गोलंदाज तुषार देशपांडे असून त्यांनी प्रत्येकी 7 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये स्पर्धेअखेरीस सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT