Arshdeep Singh Dainik Gomantak
क्रीडा

Arshdeep Singh Video: इंग्लंडमध्ये अर्शदीपची कमाल! काउंटी पदार्पणात इनस्विंगरवर मिळवली पहिली विकेट

अर्शदीप सिंगने केंटकडून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शानदार गोलंदाजी केली.

Pranali Kodre

Arshdeep Singh maiden wicket of County cricket: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने केंट संघाकडून सरेविरुद्ध खेळताना काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याला शानदार गोलंदाजी करत विकेटही मिळवली.

अर्शदीपने काउंटी क्रिकेटमध्ये सरेचा फलंदाज बेन फोक्सला बाद करत पहिली विकेट मिळलली. त्याने फोक्सला बाद करताना ओव्हर द विकेटवरून गोलंदाजी करत गुड लेंथच्या टप्प्यावर चेंडू टाकला. तो चेंडू इन स्विंग झाला आणि फोक्सच्या पॅडला लागला. त्यामुळे फोक्सला 3 धावांवरच विकेट गमाववी लागली.

अर्शदीपने केंटकडून पहिल्या डावात 14.2 षटके गोलंदाजी करताना 43 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यातील 4 षटके त्याने निर्धाव (मेडन) टाकली. त्याने फोक्सनंतर डॅनिएल वॉरेलला 12 धावांवर बाद करत सरेचा डावही संपवला. सरेने पहिल्या डावात सर्वबाद 145 धावा केल्या.

त्यापूर्वी केंटने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 301 धावा केल्या होत्या. त्यामुळे केंटने 156 धावांची मोठी आघाडी घेतली.

द्रविडमुळे प्रेरणा मिळाली - अर्शदीप

काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यापूर्वी अर्शदीपने सांगितले होते की त्याला भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडमुळे केंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.

अर्शदीप म्हणाला, 'इथे येऊन एका चांगल्या संघाचा भाग होण्याने आनंदी आणि उत्साही वाटत आहे. या काउंटी संघाला मोठा इतिहास असल्याचे मला भारतात अनेक जणांनी सांगितले. हे घरच्या सारखेच वाटत आहे. फक्त भारतापेक्षा इथे जास्त थंडी आहे.'

'केंट का, तर याला कारण राहुल द्रविड आहे. त्याने मला या क्लबच्या इतिहासाबद्दल सांगितले. त्यानेही या क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. मला त्यामुळेही या क्लबकडून खेळायचे होते. त्याने भारतातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे मलाही केंटसाठी खेळायला प्रेरणा मिळाली.'

अर्शदीपने मार्चमध्ये केंटबरोबर करार केला होता. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 7 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 25 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून 26 टी20 आणि 3 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 41 आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेत त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT