Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Shreyas Iyer: श्रेयस करणार नाही सर्जरी! 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण त्याने या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

Shreyas Iyer opted out of surgery: भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता त्याने शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे.

रिपोर्ट्सनुसार त्याने शस्त्रक्रियेसाठी नकार दिलेला असल्याने त्याला पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्रेयस डिसेंबर 2022 पासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. पण त्याने या दुखापतीनंतर फेब्रुवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन केले होते.

तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळला. तसेच चौथ्या कसोटीसाठीही त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले होते. पण चौथ्या सामन्यादरम्यानच त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढले. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतूनही बाहेर व्हावे लागले.

आता श्रेयस या दुखापतीतून कधीपर्यंत बाहेर येईल आणि आयपीएलचा दुसरा टप्पा तरी खेळू शकणार आहे की नाही, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण त्याच्या दुखापतीवर आगामी काळात बीसीसीआयचे वैद्यकिय पथक बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये लक्ष ठेवून असेल.

तसेच असे समजले आहे की अय्यरच्या मनक्यातील समस्या आहे. त्याच्या मनक्यातील एका डिस्कमध्ये आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या उजव्या पायाकडे जाणारी मज्जातंतू प्रभावित झाली आहे. त्याचमुळे त्याला हलचाल करण्यात त्रास होत आहे. त्याला गेल्या काही काळात पाठदुखीसाठी 6 इंजेक्शन्सही देण्यात आली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अय्यरने मुंबईतील मणक्याच्या तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली असून त्याला दोन पर्याय सांगण्यात आले होते की विश्रांती, उपचार आणि वेदना कमी होण्याची प्रतिक्षा कर. त्यानंतरही फरक पडला नाही, तर शस्त्रक्रिया कर.

तसेच बीसीसीआनेही त्याच्या दुखापतीबाबत लंडनमधील तज्ञ डॉक्टरांना संपर्क साधला नाही. त्यांनीही त्याला शस्त्रक्रियेपेक्षा पहिला पर्याय स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. अय्यरने काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी याबाबत वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करायची असल्याचे कळवले होते. त्यामुळे त्याने आता लगेचच शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

यामागे आणखी एक कारण असल्याची चर्चा होत आहे. ते म्हणजे शस्त्रक्रिया केली असती, तर त्याला सहा ते सात महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर व्हावे लागले असते. त्यामुळे त्याला कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याबरोबरच आशिया चषकालाही मुकावे लागले असते. तसेच वर्ल्डकपबाबतही त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. त्यामुळे आगामी महत्त्वाच्या स्पर्धा पाहाता त्याने शस्त्रक्रियेला नकार दिला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT