Igor Stimac Dainik Gomantak
क्रीडा

Igor Stimac: 'भारतात मी मदतीसाठी आलोय, सत्य सांगायला घाबरत नाही...', फुटबॉल प्रशिक्षकांचा हल्लाबोल

India Football Team: क्बलमधून खेळाडूंना मुक्त करण्याच्या प्रकरणाबाबत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Indian men national team head coach Igor Stimac on releasing players from Indian Super League clubs for International Tournaments:

भारतीय फुटबॉल संघाला आगामी काळात एशियन गेम्स, वर्ल्डकप क्वालिफायर आणि एशियन कप स्पर्धा खेळायच्या आहेत. या स्पर्धांच्या तयारीसाठी भारतीय संघातील खेळाडूंना इंडियन सुपर लीग क्लबमधून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी केली आहे.

त्यांनी याबद्दल खूप कठोर शब्दांत भाष्यही केले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय संघासमोर कठीण वेळ असून ते सत्य बोलण्यास घाबरत नाही.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्टिमॅक यांनी म्हटले आहे की 'माझ्या भाषेबद्दल मला माफ करा. पण मी मदतीसाठी भारतात आलो होते. जर तुम्हाला माझ्याकडून मदत हवी आहे, तर मला तुम्हाला सत्य सांगावेच लागणार आहे. तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल.'

'मला तुम्ही समस्यांमधून बाहेर येण्यासाठी मदत करू शकता किंवा मला सांगू शकता की आम्ही काहीही बदलणार नाही आणि कृपया तुम्ही घरी जा. मी आनंदाने घरी जाई आणि आपण चांगले मित्र बनून राहू.'

त्याचबरोबर स्टिमॅक यांनी भारताकडे चांगली बुद्धिमत्ता असल्याचेही म्हटले. ते म्हणाले, 'भारतात जगातिल सर्वात चांगली बुद्धिमत्ता आहे. तुम्ही मला सांगत आहात की कँलेंडरमध्ये तुम्ही तडजोड करू शकत नाही जेणे करून राष्ट्रीय संघाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल? की त्याच दुसरा काही हेतू आहे?'

'मला हे सांगायला काहीच समस्या नाही, कारण हेच सत्य आहे. जो कोणी मला चुकीचे सिद्ध करू इच्छित आहे, तो माझ्याशी सार्वजनिकरित्या वाद घालू शकतो. मला सांगू शकता का की मुख्य समस्या काय आहे?'

भारतीय संघाला पुढील आठवड्यात थायलंडमध्ये किंग्स कप स्पर्धाही खेळायची आहे. तसेच नंतर 23 वर्षांखालील आशियाई स्पर्धेचे क्वालिफायरही होणार आहेत. याशिवाय एशियन गेम्सही आहेत. अशा परिस्थितीत क्लबमधून भारतीय संघांच्या सामन्यांसाठी खेळाडू मुक्त करण्याबाबत सध्या बरीच चर्चा आहे.

क्लब्सने खेळाडूंना मुक्त करण्यास नकार दिल्याने सराव शिबिरही रद्द करावे लागले होते. फिफाच्या निर्धारित तारखांव्यतिक्त राष्ट्रीय संघांच्या सराव शिबिरांच्या तारखा असल्याने क्लब खेळाडूंना मुक्त करण्यासाठी बांधील नसतात.

दरम्यान स्टिमॅक यांना एशियन गेम्सनंतर एशियन कपसाठीही अशीच परिस्थिती दिसण्याची भीती सतावत आहे.

स्टिमॅक असेही म्हणाले, की 'मला माहित आहे की खेळाडूंनी क्लबमध्ये असणे महत्त्वाचे असते, त्यांना क्लब शर्यतीत राहणे महत्त्वाचे असते. पण जेव्हा आपल्या मुळ ध्येयांबाबत गोष्ट असते, तेव्हा आपल्याला पुढील चार वर्षात आशियामधील अव्वल आठ - अव्वल दहा संघात स्थान मिळवायचे आहे. आपण एकत्र वेळ न घालवता आणि एकत्र काम न करता हे ध्येय कसे गाठणार आहोत?'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एशियन गेम्ससाठी आधी भारतीय फुटबॉल संघ पात्र ठरला नव्हता. कारण भारतीय क्रीडा खात्याच्या नियमानुसार जर आशिया खंडातील क्रमवारीमध्ये पहिल्या 8 संघात स्थान असेल, तरच फुटबॉल संघ एशियन गेम्ससाठी पाठवला जातो. मात्र, भारताचे पुरुष आणि महिला या दोन्ही संघांची क्रमवारी आशिया खंडात 10 च्या खाली आहे.

परंतु, भारताच्या क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाने नियमांमध्ये सुट दिल्याने भारतीय फुटबॉल संघांच्या एशियन गेम्समधील सहभागाचा मार्ग मोकळा झाला. त्याचमुळे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय फुटबॉल संघ खेळताना दिसणार आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT