Indian Men And Women Compound Team won Gold Medal at Archery World Cup Stage 4:
पॅरिसमध्ये झालेल्या स्टेज फोर तिरंदाजी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची कामगिरी शानदार राहिली आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी कपांउंड प्रकारात शनिवारी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे सध्या दोन्ही संघांचे कौतुक होत आहे.
भारतीय महिला कपाउंड संघाने अंतिम सामन्यात मेक्सिकोला अवघ्या एका गुणाने मात दिली. भारतीय महिला संघाने अंतिम लढत 234-233 अशा फरकाने जिंकत सुवर्णपदक पटकावले. या भारतीय संघात परनीत कौर, आदिती गोपुचंद स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांचा समावेश होता.
दोन्ही संघांमध्ये अंतिम सामन्यात चढाओढ होती. पण अखेरच्या क्षणी भारतीय महिला तिरंदाजांची अजूक वेध घेत 59 गुण मिळवल्याने सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळाले. याच संघाने याच महिन्याच्या सुरुवातीला बर्लिनला झालेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
पुरुषांच्या कंपाउंडच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 236-232 अशा फरकाने दुसऱ्या मानांकित अमेरिका संघाला पराभूत केले. चौथ्या मानांकित भारतीय संघात ओजस देवताळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश दावकर यांचा समावेश होता.
या संघाला सुरुवातील पिछाडी स्विकारावी लागली होती. पण दुसऱ्या फेरीत भारताने अमेरिकेशी 118-118 अशी बरोबरी झाली. पण तिसऱ्या फेरीत भारतीय तिरंदाजांनी अमेरिकेच्या ख्रिस शॅफ, जेम्स लुत्झ आणि स्वायर सुलिवान यांना मात देत सामना जिंकला. सुवर्णपदकाचा वेध घेतला.
यापूर्वी याच स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारामध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघाने ब्राँझपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे रिकर्व्ह आणि कपाउंड अशा दोन्ही प्रकारात भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांना पदके मिळवता आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.