U20 World Championships: कुस्तीच्या आख्याड्यात अंतिम पांघलने सुवर्णाक्षरात कोरले नाव! सलग दुसऱ्यांदा ठरली वर्ल्ड चॅम्पियन

Antim Panghal: अंतिम पांघलने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.
Antim Panghal
Antim PanghalDainik Gomantak
Published on
Updated on

Antim Panghal created history by winning back-to-back U20 Wrestling World Championships:

भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पांघल हिने इतिहास रचला आहे. तिने सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे ती सलग दोनदा विश्वविजेती होणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.

अंतिमने युक्रेनच्या मारिया याफ्रिमोवाविरुद्ध 53 किलोग्रॅम वजनी गटात 4-0 फरकाने विजय मिळवत तिचे विश्वविजेतेपद राखले. तिने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करताना आक्रमक खेळ केला. तिच्या जलद हलचालींपुढे मारिया याफ्रिमोवाचा बचाव फिका पडला.

अंतिमचे संपूर्ण स्पर्धेतच वर्चस्व राहिले असून तिच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांना केवळ 2 गुणच मिळवता आले.

Antim Panghal
Asian Games India Wrestling Team: वादविवादानंतर अखेर एशियन गेम्ससाठी भारताचा कुस्ती संघ जाहीर; बजरंग-विनेशचा समावेश, पण...

भारताने सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेत नोंदवली आहे. यापूर्वी प्रिया मलिकने 76 किलो वजनी गटात आणि मोहित कुमारने 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच सविताने 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

याशिवाय अंतिम कुंडूने 65 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. याशिवाय रिनाने 57 किलो वजनी गटात, तर हर्षिताने 72 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.

तथापि, ग्रीको-रोमन प्रकारात मात्र भारताच्या कुस्तीपटूंची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांना पदक जिंकता आले नाही.

Antim Panghal
भारताला धक्का! विनेश फोगट 'या' कारणाने Asian Games मधून बाहेर; 19 वर्षीय खेळाडूला संधी

अंतिम खेळणार एशियन गेम्समध्ये

सलद दुसऱ्यांदा 20 वर्षांखालील विश्वविजेती ठरलेली अंतिम गेल्या काही काळापासून चर्चेत होती. चीनमध्ये यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्ससाठी विनेश फोगटला थेट प्रवेश देण्याबद्दल तिने न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विनेशने गुडघ्याच्या दुखापतीमुळे एशियन गेम्समधून नाव मागे घेतले आहे. त्यामुळे 19 वर्षीय अंतिम पांघलचा एशियन गेम्समधील सहभागाचा मार्ग मोकळा झाला.

विनेशला फ्री-स्टाईल महिला 53 किलो वजनी गटातून एशियन गेम्समधून थेट प्रवेश देण्यात आला होता. पण असे असले तरी या गटाच्याही ट्रायल्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून अंतिमने बाजी मारली होती.

मात्र, विनेशला प्रवेश मिळालेला असल्याने अंतिमला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. पण आता विनेश बाहेर झाल्याने अंतिम एशियन गेम्स खेळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com