Indian Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: अपराजित भारताने उडवला मलेशियाचा धुव्वा; पाँइंट टेबलमध्येही नंबर वन

Indian Hockey Team: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने बलाढ्य मलेशियालाही पराभवाचे पाणी पाजले.

Pranali Kodre

Indian Hockey Team beat Malaysia 5-0 in Asian Champions Trophy Chennai 2023: भारतीय हॉकी संघ आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत पहिल्या तीन्ही सामन्यांनंतर अपराजित राहिला आहे. भारताचा तिसरा सामना रविवारी बलाढ्य मलेशियाविरुद्ध झाला होता. भारताने मलेशियालाही पराभवाचे पाणी पाजले.

भारताने मलेशियाविरुद्ध 5-0 असा दणदणीत विजय मिळवला असून गुणतालिकेतही अव्वल स्थान गाठले आहे. यापूर्वी भारताने चीनविरुद्ध 7-2 असा विजय मिळवला होता, तर जपानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी स्विकारली होती.

मलेशियाविरुद्ध मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून कार्थी सेल्वम (15'), हार्दिक सिंग (32'), हरमनप्रीत सिंग (42'), गुरजंत सिंग (53') आणि जुगराज सिंग (54') यांनी गोल नोंदवले. महत्त्वाचे म्हणजे हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेला गोल त्याच्यासाठी खास ठरला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 150 वा गोल ठरला.

या सामन्यापूर्वी मलेशिया गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ३-१ आणि चीनविरुद्ध 5-1 असा विजय मिळवलेला होता. पण भारताने मलेशियाला पराभूत करत अव्वल क्रमांक पटकावला.

आता भारताचा या स्पर्धेतील चौथा सामना 7 ऑगस्ट रोजी कोरिया विरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरुवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT