Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: 'तू फायटर आहेस...' टीम इंडियाकडून पंतसाठी इमोशनल मेसेज, पाहा Video

भारतीय खेळाडूंनी पंतसाठी संदेश देतानाचा इमोशनल व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केलाय.

Pranali Kodre

Team India: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा गेल्या आठवड्यात 30 डिसेंबर रोजी कार अपघात झाला. त्यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याला लवकरात लवकर बरा हो आणि मैदानात परत ये, असा संदेश त्याच्या भारतीय संघातील संघसहकाऱ्यांनी दिला आहे.

मंगळवारी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडसह काही खेळाडू पंतला संदेश देताना दिसत आहेत. सध्या मंगळवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज आहे.

याचदरम्यान खेळाडूंनी पंतला संदेश दिला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविडने म्हटले, 'ऋषभ, आशा आहे की तू ठिक असशील, तू लवकर बरा हो. गेल्या एक वर्षापासून तूला भारतीय कसोटी इतिहासातील काही शानदार खेळी करताना पाहायची संधी मला मिळाली.'

'जेव्हाही आपण कठीण परिस्थितीत अडकतो, त्यावेळी त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता तुझ्यात आहे. हे देखील तसेच आव्हान आहे. मला माहित आहे तू पुनरागमन करशील, जसे तू अनेकदा केले आहेस.'

(Indian cricketers wished Rishabh Pant a speedy recovery)

तसेच श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याने सांगितले की 'ऋषभ, तू लवकर बरा हो. तू लढवय्या आहेस. काहीवेळा अपेक्षित असलेल्या काही गोष्टी घडत नाहीत, पण हेच आयुष्य आहे. पण तू सर्व दरवाजे तोडून पुन्हा पुनरागमन करशील, जसे तू नेहमी करतो. माझे प्रेम आणि शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत.'

तसेच सूर्यकुमारनेही 'आम्ही तूला मिस करतोय', असे म्हणत त्याला लवकर बरा होण्याचा संदेश दिला. याबरोबरच युजवेंद्र चहलने विनोदी पद्धतीने पंतला बरा होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, 'लवकर बरा हो, आपण मिळून चौकार-षटकार मारू.'

याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनीही पंतला लवकर बरा होण्याचा संदेश दिला आहे.

पंतची प्रकृती स्थिर

पंतचा अपघात तो दिल्लीवरून रुडकीला येत असताना डिव्हायडरला कार धडकल्याने झाला. अपघातानंतर त्याने स्वत:ला कारमधून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. अपघातादरम्यान त्याला बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी मदत केली. दरम्यान, या अपघातात पंतची कार पूर्णपणे जळाली.

सध्या पंतची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातादरम्यान पंतच्या डोक्याला दोन खोचा पडल्या आहेत, तसेच हाताच्या मनगटाला, पायाच्या बोटांना आणि पाठीलाही दुखापती झाल्या आहेत. याशिवाय त्याच्या गुडघ्यात लिगामेंट टिअर झाले आहेत.

आता पंतला या दुखापतींमधून बाहेर येण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो या कालावधीत क्रिकेट मैदानापासूनही दूर राहाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT